Home गाजावाजा स्पेशल WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही
गाजावाजा स्पेशल

WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

14
WhatsApp New Feature
WhatsApp New Feature

WhatsApp Privacy Feature : मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण तरीही व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर मेसेजिंगसाठी केला जातो. याच कारणास्तव वेळोवेळी व्हॉट्सअॅपकडून अपडेट्स आणले जातात. अशातच आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट युजर्सला काढता येणार नाही. खरंतर, कंपनीने मेसेजिंग अॅपच्या प्रायव्हेसीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्याचा विचार केला जात आहे.

अॅन्ड्रॉइड पोलिसांच्या रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपवर प्रायव्हेसी संदर्भात काम केले जात आहे. दरम्यान, मेटा किंवा व्हॉट्सअॅपने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. नवे प्रायव्हेसी अपडेट व्हॉट्सअॅप सर्वरकडून येणार आहे. याचा अर्थ असा आहे की, अॅप आणि ब्राउजरसाठी नवे अपडेट आणळे जाणार आहे.

व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही
रिपोर्टनुसार, कोणत्याही युजरला दुसऱ्या युजरच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही. त्याला स्क्रिनशॉर्ट घेताना अॅलर्टचा मेसेज दाखवला जाईल. मोबाईल फोन आणि डेस्कटॉप या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपच्या बीटा आणि स्टेबल अशा दोन्ही वर्जनमध्ये प्रायव्हेसी अपडेटचे काम केले जाणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपला सिग्नल आणि टेलिग्रामकडून टक्कर दिली जात आहे. पण हे दोन्ही प्लॅटफॉर्म युजर्सला प्रायव्हेसीचे कोणतेही फिचर्स देत नाही. (WhatsApp Privacy Feature)

आणखी एक नवे फीचर येणार
व्हॉट्सअॅप आणखी एक नव्या फीचरवर काम करत आहे. याच्या मदतीने युजर्सला दुसऱ्या मेसेजिंग अॅपवर देखील मेसेज पाठवता येणार आहेत. युजर्सला मेसेज शेअर करण्यासाठी सिग्नल, टेलिग्राम सारख्या अॅपचे ऑप्शन मिळणार आहे. WABetainfo च्या मते हे फीचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा वर्जन 2.24.5.18 वर उपलब्ध आहे.


आणखी वाचा :
देशातील पहिले डॉफ्लिन संशोधन केंद्र
जगातील श्रीमंत महिलांमध्ये ‘या’ भारतीय लेडीचाही समावेश
जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती या ठिकाणी आहे

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....