Home राजकारण खासदार असावा तर असा! अंगात अशक्तपणा, हाताला सलाईन असतानाही उतरला मराठा मोर्चाच्या आंदोलनात
राजकारण

खासदार असावा तर असा! अंगात अशक्तपणा, हाताला सलाईन असतानाही उतरला मराठा मोर्चाच्या आंदोलनात

10
Dhairyasheel Mane | K Facts

कोल्हापुरात आजपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली मुक आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. कोल्हापूरातील शाहू समाधी स्थळापासून सकाळी १० वाजता या मोर्चास सुरुवात झाली आहे. मात्र या मोर्चात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे धैर्यशील माने यांनी.

कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची तब्बेत ठीक नसतानाही हाताला सलाईन लावून मोर्चात एन्ट्री केल्याने सर्व स्तरावरून धैर्यशील माने यांचे कौतुक होत आहे.

धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. अंगात अशक्तपण असतांना देखील धैर्यशील माने यांनी मराठा क्रांती मुक आंदोलनात सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.


यावेळी बोलताना धैर्यशील माने म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेत महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं आहे. या आंदोलनाच्या लढाईत सर्व प्रतिनिधींना एकत्र केल पाहिजे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली आहे. त्यामुळे त्यांच्या हाकेला आपण सर्वांनी या ठिकाणी आले पाहिजे.”

तसेच, “प्रकाश आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले आहेत. आरक्षणाचा प्रश्न कोणामुळे थांबला, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? याकडे आता आपण गांभीर्याने पहिले पाहिजे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन.” असे शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Kranti Morcha) मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रात मराठा क्रांती मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पाठिंंबा दर्शवला आहे. तसेच या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली आहे.

– निवास उद्धव गायकवाड

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...