Home मनोरंजन Year Ender 2023: यंदाच्या वर्षात ‘या’ अभिनेत्रींचे ब्राइल लूक राहिले चर्चेत
मनोरंजन

Year Ender 2023: यंदाच्या वर्षात ‘या’ अभिनेत्रींचे ब्राइल लूक राहिले चर्चेत

11
Year Ender 2023

आपल्या ब्राइडल लूक बद्दल एक नववधू खुप स्वप्न पाहते. काही ब्राइडल्स अशा असतात जे सेलिब्रेटीचे ब्राइडल लूक कॉपी करू पाहतात तर काही त्यांच्या लूकवरून काहीतरी हटके करतात. बहुतांशवेळा पाहिले गेले आहे की, ब्राइड्स आपल्या लूक बद्दल खुप टेंन्शनमध्ये असतात. त्यांना कळत नाही नक्की कसा आपला पेहराव असावा. जेणेकरुन त्या परिणिती किंवा कियारा सारख्या हटके लूक मध्ये दिसतील. अशातच यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांचे ब्राइडल लूक चर्चेत राहिलेत हे पाहूयात. (Year Ender 2023)

परिणिती चोपड़ा

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणिती चोपड़ाचा सटल ब्राइडल लूक खुप ट्रेंन्डमध्ये राहिला. या ब्राइडल लूकसाठी २५०० तासांचा वेळ लागला होता. आपल्या लग्नासाठी तिने बेज रंगाचा लहंगा निवडला होता. यामध्ये सीक्वेन वर्कचे काम केले होते. हा सुंदर ब्राइडल लहंगाचे डिझाइन मनीष मल्होत्राने केले होते. तुम्ही सुद्ध हा लूक रिक्रिएट करू शकता. आजकाल तर बेज कलर खुप ट्रेंन्डमध्ये आहे. खासकरून ब्राइड्स या रंगाचे लहंगा घालणे पसंद करत आहेत.

कियारा अडवाणी ब्राइडल लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणी हिचा सुद्धा ब्राइडल लूक खुप चर्चेत राहिला. तिने यंदाच्या वर्षी ७ फेब्रुवारीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत विवाहगाठ बांधली. या खास दिवसासाठी कियाराने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले आउटफिट्स निवडले. त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. लहंग्यासाठी तिने लाइट पिंक रंग निवडला होता. तर हा लहंगा जवळजवळ २०० कारागिरांनी मिळून तयार केला होता. त्याचसोबत तो तयार करण्यासाठी तब्बल ६७०० तास लागले. कियाराने या लहंग्यासोबत ग्रीन डायमंड ज्वेलरी घातली होती.

माहिरा खान

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

आजकाल सध्या अधिक सटल रंग पसंद केला जात आहे. यामुळे जेवढ्या अभिनेत्रींनी लग्न केले त्यांनी आपला लहंगा लूकसाठी सटल गोष्टीच निवडल्या. त्यामुळे हा यंदाच्या वर्षातील ट्रेंन्ड ठरला. अलीकडेच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने आपल्या लग्नासाठी रेड आणि ग्रीन रंग सोडून ऑफ व्हाइट रंगाचा लहंगा निवडला होता. जो डिजाइनर फराज मनन द्वारे डिझाइन करण्यात आला होता. या लहंग्यावर विविध प्रकारे काम केले आहे. लहंग्यावर सिल्वर, शॅम्पेन गोल्डन जरदोजी वर्क, सीक्वेंस वर्क आणि पर्ल्सचे काम करण्यात आले आहे.

स्वरा भास्कर

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सुद्धा आपल्या ब्रॉयफ्रेंन्डसोबत लग्न केले. तिचा ब्राइडल लूक सुद्धा चर्चेत होता. या खास दिवसासाठी तिन तेलुगू ब्राइडल लूक कॅरी केला होता. यासाठी तिन लाल रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती. त्याचसोबत टेंम्पल ज्वेलरी पेअर केली होती. या लूकमध्ये पारंपारिक इंडियन ब्राइड वाटत होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा लहंग्याऐवजी एक उत्तम साडी नेसू शकता. यामध्ये सुद्धा तुमचा लूक अधिक खुलला जाईल आणि तुम्ही कंम्फर्टेबल रहाल. (Year Ender 2023)

हे होते यंदाच्या वर्षातील सेलेब्सचे चर्चेत ठरलेले ब्राइडल लूक्स. जे तुम्ही सुद्धा तुमच्या वेडिंगसाठी नक्की ट्राय करू शकता.


हेही वाचा- प्रोडक्शन हाउस तर कधी एक्टिंग स्कूल, ‘या’ कलाकारांनी केलाय आर्थिक तंगीचा सामना

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...