Home गाजावाजा स्पेशल इंस्टाग्रामसाठी ट्रेंडिंग हॅशटॅग वापरण्याची सोप्पी ट्रिक
गाजावाजा स्पेशल

इंस्टाग्रामसाठी ट्रेंडिंग हॅशटॅग वापरण्याची सोप्पी ट्रिक

11
instagram hashtags
instagram hashtags

जर तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवर व्हायरल होण्याच्या ट्रिक्स शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्या नक्की कामी येणार आहे. खरंतर सोशल मीडियात व्हायरल होण्यासाठी विविध ट्रिक्स वापरल्या जातात. त्यामुळे त्यापैकीच एक असलेले हॅशटॅश हे फार महत्त्वाचे आहेत. ट्रेंन्डिंग हॅशटॅग कसे शोधायचे असा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. खरंतर तुम्ही ट्रेंन्डिंग हॅशटॅश गुगलवर आणि इंस्टाग्रमावरही चेक करू शकता. पण त्यासाठी पुढील काही टेक्निक नक्की तु्म्हाला वापरावी लागणार आहे. (Instagram Hashtags)

हॅशटॅग बद्दल जाणून घेण्यापूर्वी त्याचा नक्की अर्थ काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हॅशटॅग हा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सोशल मीडियात आपण एखाद्याला टॅग कसे करायचे हे आपल्याला माहिती असते. पण हॅशटॅग म्हणजे तुमची पोस्ट त्या संबंधित सर्व पोस्टच्या कॅटेगरीत टाकणे. हॅशटॅग हे गुगलसाठी मेटाडेटा सारखे काम करते. त्याच्या मदतीने विविध कॅटेगरीतील कंटेट इंटरनेटवर हॅशटॅगच्या मदतीने अगदी सहज सर्च केले जाऊ शकतात.

Hashtag Generator for Instagram - Snoopreport.com Blog

ट्रेंन्डिंग हॅशटॅग असे करा सर्च
यासाठी सर्वात प्रथम आणि सोप्पी ट्रिक म्हणजे तुम्ही अॅक्टिव्ह आणि पॉप्युलर युजर्सचे अकाउंट्स सर्च करा. हे चेक करा की, त्या लोकांनी कोणते हॅशटॅग्स वापरले आहेत. त्या हॅशटॅगचा तुम्ही वापर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे कंटेट क्रिएट करू शकता आणि इंस्टाग्राम सर्चबार मध्ये त्या संबंधित हॅशटॅगचे नाव लिहा. असे केल्याने तुम्हाला त्या संबंधित हाइस्ट युज करण्यात आलेले हॅशटॅग दिसतील.

गुगलपर शोधू शकता हॅशटॅग
गुगलवर हॅशटॅग शोधण्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला गुगलवर आपला फोटो किंवा रिल्स संबंदित शब्द लिहा आणि सर्च करा. गुगलवर काही वेबसाइट्सचे ऑप्शन दिसतील. तुम्ही सर्वात प्रथम दिसणारा ऑप्शन ओपन करू शकता. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा अन्य काही हॅशटॅग्सही तुम्हाला पहायला मिळतील. येथे दिलेले काही हॅशटॅग तुम्ही निवडू शकता आणि आपल्या रिल्सखाली लिहू शकता.(Instagram Hashtags)

हॅशटॅग वापरताना वेळेची काळजी घ्या
जर तुम्ही तुमच्या पोस्टसाठी हॅशटॅग वापरत असाल तर नेहमीच त्यासंबंधित टॅग्स असावेत. हॅशटॅग कधीच कॉपी पेस्ट करू नका. केवळ हॅशटॅग लावल्याने काम होणार नाही. आपल्या कंटेटमध्ये सुधारणाही करावी लागले. अन्यथा कंटेट कितीही चांगला असेल तरीही तो इतरांपर्यंत पोहचणार नाही. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे कोणत्या वेळी तुम्ही हॅशटॅग वापरून पोस्ट शेअर करत आहात हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे.


हेही वाचा- 300 कोटींचा बिझनेस 8 हजारांवर पोहचवणाऱ्या नादिया चौहान यांची कथा

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....