Home मनोरंजन शाहरूख खानकडे जेव्हा पत्नी गौरीला हनिमूनला नेण्यासाठी नव्हते पैसे तेव्हा…
मनोरंजन

शाहरूख खानकडे जेव्हा पत्नी गौरीला हनिमूनला नेण्यासाठी नव्हते पैसे तेव्हा…

10
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

अभिनेता शाहरूख खान याला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखले जाते. तर पत्नी गौरी खान हिला त्याची क्विन म्हटले जाते. दोघांची जोडी हिंदी सिनेमातील सर्वाधिक पसंदीच्या जोडींपैकी एक आहे. सिनेमाच्या पडद्यावर किंग ऑफ रोमांन्ससाठी प्रसिद्ध असलेला शाहरूख हा खऱ्या आयुष्यातही रोमांन्सचा बादशाह आहे. शाहरूख आणि गौरी यांची लव्ह स्टोरी एखाद्या ‘मोहब्बते’ सारखीच आहे. (Shah rukh khan)

शाहरूख आणि गौरी यांची पहिली भेट
दोघांची भेट एका पार्टीत झाली होती. त्यावेळी शाहरूख केवळ 19 वर्षांचा होता तर गौरी 14 वर्षांची होती. त्यांच्या पहिल्याच भेटीवेळी शाहरूखला ती आवडली होती. मात्र तेव्हा गौरीला तो आवडला नव्हता. जेव्हा शाहरूखने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा गौरीने त्याला माझा बॉयफ्रेंन्ड बाहेर वाट पाहतोय असे उत्तर दिले होते.

पॅरिस बोलून दार्जिलिंगला हनिमूनसाठी घेऊन गेला
जेव्हा शाहरूखला कळले गौरी त्याच्याशी खोट बोलली आहे तेव्हा त्याने तिला बहिण नात्यावरुन डिवचले. नंतर ती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्याला भेटू लागली. त्यांच्यातील मैत्रीचे नाते प्रेमात रुपांतर झाले. 1991 मध्ये शाहरूखने गौरी सोबत लग्न केले. जेव्हा लग्न केले होते तेव्हा शाहरूखने बॉलिवूडमध्ये पाऊल सुद्धा ठेवले नव्हते. पण त्याने फौजी आणि सर्कस सारख्या टेलिव्हिजन सीरियलमध्ये काम केले होते. त्याला सिनेमांसाठी ऑफर येत होत्या. शाहरूखने एका सोहळ्यावेळी त्याच्या हनिमूचा किस्सा सुनावला होता. त्याने म्हटले होते की, जेव्हा त्याचे लग्न झाले होते तेव्हा तो गरीब होता आणि गौरी फार श्रीमंत होती. मात्र शाहरूखने गौरीला आश्वासन दिले होते की, लग्नानंतर तो तिला पॅरिसला नक्कीच फिरायला घेऊन जाईल. एफिल टॉवर अशा काही ठिकाणाही जाईल. परंतु पैसे नसल्याच्या कारणास्तव शाहरूखने गौरीला पॅरिस ऐवजी दार्जिलिंगला हनिमूनला नेले. (Shah rukh khan)

गौरीशी लग्न करताना आले होते अडथळे
शाहरूखला आपल्या प्रेमासाठी काही खुप संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी शाहरूखची फौजी सीरियलच्या माध्यमातून करियरची उत्तम सुरुवात झाली होती. तरीही गौरीच्या आई-वडीलांनी त्याला नकार दिला होता. खरंतर वेगळ्या धर्माचा असल्याने त्याला नकार दिला होता. गौरीच्या आईला तिचे लग्न शाहरूख सोबत नको व्हावे असे वाटत होते. त्यांना असे वाटत होते की, एका टिव्ही अभिनेत्यासोबत लग्न झाले तर त्यांच्या मुलीचे आयुष्य काही उत्तम जाणार नाही. त्यात दोघांचा धर्मही वेगळा आहे.त्याचसोबत त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी काही गोष्टी सुद्धा केल्या गेल्या होत्या.

‘दीवाना’ सिनेमानंतर शाहरूखला लग्नासाठी मिळाला होकार
शाहरूख खान याचे नशीब तेव्हा पालटले जेव्हा त्याला दीवाना सिनेमासाठी ऑफर मिळाली. हा सिनेमा त्याच्यासाठी काही कारणास्तव फार खास होता. सर्वात प्रथम तर शाहरूखला या सिनेमामुळए बॉलिवूड मधील रोमांन्स किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. तर दुसऱ्या बाजूला त्याला गौरीशी लग्न करण्यासाठी परिवाराकडून होकार मिळाला होता.

आज लॅविश आयुष्य जगतायत दोघे
आज शाहरूख खान आणि गौरी खआन बॉलिवूड मधील सर्वाधिक पसंदीच्या कपल्सपैकी एक आहेत. गौरी सोबत लग्न केल्यानंतर शाहरूख खानला सर्वात प्रथम मुलगा आर्यन खान झाला. त्यानंतर मुलगी सुहाना आणि आता तिसरा मुलगा अबराम आहे. हे दोघेही आणि संपूर्ण परिवार आज आनंदी आयुष्य जगत आहेत.


हेही वाचा- करियरच्या सुरुवातीला शाहरूख सोबत केली होती शाहिद कपूरची तुलना

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...