Home गाजावाजा स्पेशल जामवंत गुहेचे रहस्य… 
गाजावाजा स्पेशल

जामवंत गुहेचे रहस्य… 

7
Jamwant Caves

रामायणामध्ये जामवंत यांची भूमिका प्रमुख होती.  प्रभू राम आणि रावण यांच्या युद्धात जामवंत यांचे स्थान महत्त्वाचे होते. प्रभू श्रीरामांना अनेकवेळा योग्य सल्ला त्यांनी दिला होता.  याच जामवंतानी हनुमानला त्यांच्या शक्तींची आठवण करुन दिली होती.  त्यानंतरच हनुमानांनी लंकेपर्यंत झेप घेऊन माता सीता कुठे आहेत, याचा शोध घेतला होता.  युद्धामध्ये जेव्हा प्रभू रामांनी रावणाचा वध केला, तेव्हा प्रभू रामांकडे तक्रार केली, की या युद्धात मला माझे युद्धकौशल्य दाखवण्याची संधीच मिळाली नाही. प्रभू राम जामवंत यांचा आदर करत असत.  त्यांनी जामवंतजींना द्वापरमध्ये मी तुझ्याशी युद्ध करेन,  असे आश्वासन दिले. (Jamwant Caves)

भगवान श्रीकृष्ण अवतारात जेव्हा प्रकट झाले तेव्हा भगवानांनी जामवंत यांच्याबरोबर एका गुहेत युद्ध केले. तब्बल 27 दिवस हे युद्ध चालले.  ही गुहा  सर्वसामान्यांचासाठी आश्चर्यांचे स्थान आहे. आजही ही गुहा असून त्यामधील रुद्राक्षाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त गुहेमध्ये जाऊन भगवान शंकर, प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त जामवंत यांचा जयजयकार करतात.  या गुहेमध्ये हजारो वर्षाचा खजिना असल्याचीही कथा सांगितली जाते.  ही गुहा जम्मू आणि काश्मिरमध्ये आहे.  या गुहेतील रुद्राक्षाचे शिवलिंग हे जगातील एकमात्र रुद्राक्ष शिवलिंग असल्याची माहिती आहे.  प्रत्यक्ष भगवान शंकरांनी हे जामवंत यांना दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या पवित्र गुहेमध्ये आजही हजारो भक्त दर्शनासाठी जातात.  (Jamwant Caves)

जामवंत यांचा उल्लेख रामायण आणि महाभारतातही आहे.  महाभारत काळात स्यमंतक मणीसाठी, श्रीकृष्ण आणि जामवंत यांच्यात 27 दिवस युद्ध झाले.  जामवंताने श्रीकृष्णाच्या रुपात श्रीराम यांना पाहिले. तेव्हा त्यांना रामायणात प्रभू श्रीरामांनी दिलेल्या वरदानाची आठवण झाली.  त्यांनी आपली कन्या जामवंतीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर करुन दिला. याच जामवंत यांचा वास भारताचे स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणा-या जम्मू आणि काश्मिरमध्ये होता.  प्राचीन काळापासून हा सर्व भाग आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे होता.  हिंदू धर्मातील अनेक मंदिरे या भागात होती.   शिवपुराण, स्कंद पुराणांसह अनेक धार्मिक ग्रंथांत जम्मू-काश्मीरचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे.  या जम्मूमध्ये तवी नदीच्या काठावर जामवंत यांची मोठी गुहा आहे. (Jamwant Caves)

या गुहेमध्ये जामवंत हजारो वर्षापूर्वी राहत असत आणि भगवान शंकराची तपश्चर्या करीत असत.  आता या गुहेला पीर खो गुफा असे म्हटले जाते.  मात्र स्थानिक आजही या गुहेला जामवंत गुहा म्हणून ओळखतात. ही गुहा ऋषीमुनींच्या  तपश्चर्येसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील एकमेव रुद्राक्ष शिवलिंगही याच गुहेत आहे. या रुद्राक्ष शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष  जामवंतांनी भगवान शंकराच्या आदेशानं स्थापना केल्याची माहिती स्थानिक सांगतात. हा जामवंत यांनी स्थापित केलेले रुद्राक्ष शिवलिंग आजही त्याच पीर खो किंवा जामवंत गुहेत आहे.  याशिवाय ही भव्य गुहा देशातील अनेक मंदिरे आणि गुहांशी जोडलेली असल्याचे स्थानिक सांगतात.  या गुहेत अनेक वेगवेगळे आवाज येतात.  या गुहेबद्दल अनेक रहस्ये सांगितली जातात. मुख्य म्हणजे, येथील रुद्राक्ष शिवलिंगाबाबत शिवभक्तांमध्ये मोठी आस्था आहे.  या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी या जामवंत गुहेत भक्तांची मोठी गर्दी होते.  (Jamwant Caves)

या जामवंत गुहेबद्दल अनेक रहस्य असून त्यापैकी एक म्हणजे, या गुहेत कोट्यवधी रुपयांचा खजिना अजूनही असल्याची धारणा आहे. रामायण आणि महाभारत काळात असणारे जामवंत यांच्याकडे मोठी धन संपत्ती होती.  ही धन संपत्ती त्यांनी याच गुहेतील गुप्त जागी ठेवल्याचे स्थानिक सांगतात.  जम्मू शहराच्या पूर्व टोकाला ही गुहा आहे. याच गुहेत रुद्राक्ष शिवलिंगासमोर भगवान श्रीकृष्ण आणि जामवंत कन्या सत्यभामा यांचा विवाह झाल्याचेही सांगितले जाते.  त्यामुळे नवविवाहित या गुहेतील रुद्राक्ष शिवलिंगासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.  (Jamwant Caves) 

===========

हे देखील वाचा : नवसपूर्तीसाठी ‘या’ देवीला अर्पण करतात घोडे…

===========

जामवंत गुंफेची माहिती सर्वप्रथम शिवभक्त गुरु गोरखनाथजी यांना मिळाली. त्यांनी त्यांचे शिष्य जोगी गरीबनाथ यांना या गुहेची काळजी घेण्याची सूचना केली.  ही जामवंत गुहा 6 हजार वर्षांहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते. पुढे या गुहेची माहिती मिळाल्यावर जम्मू-काश्मीरचे राजा बैराम देवजी यांनी 1454 ते 1495 या काळात या गुहेत मंदिर बांधले.  या मंदिराच्या भिंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे कोरलेली आहेत.  प्रांगणात, शिव मंदिरासमोर, पीर पूर्णनाथ आणि पीर सिंधिया यांच्या समाधी आहेत. तवी नदीच्या काठी वसलेल्या जामवंत गुहेसह साधना कक्षही  बांधण्यात आला आहे.   

सई बने

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....