Home गाजावाजा स्पेशल तुळशीची माळ घालणार असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
गाजावाजा स्पेशल

तुळशीची माळ घालणार असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

12
tulsi mala
tulsi mala

हिंदू धर्मात बहुतांश लोकांच्या घरी तुळशीचे झाड असते आणि त्याची ते पूजा करतात. तुळशीला देवीचे स्थान दिले गेले आहे. कोणत्याही प्रकारच्या पूजेसाठी किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर तुळशीच्या पानाचा वापर केला जातो. मात्र तुळशीची माळ नक्की कोणी घालावी आणि ती घालण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत. (Tulsi Mala)

तुळशीत माता लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते. तुळशीची माळ भगवान विष्णुच्या मंत्रांचा जाप करण्यासाठी फलदाई मानली जाते. ज्योतिष शास्रानुसार, शनिची साढेसाती किंवा शनिचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी तुळशीची माळ घालण्याचा सल्ला दिला जातो. तुळशीच्या झाडासमान तुळशीची माळ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशीची माळ घालणाऱ्या लोकांना अनेक लाभ होतात. तत्पूर्वी माळा धारण करण्यासंदर्भातील काही नियम माहिती पाहिजेत.

-माळ वारंवार काढू नका
ज्योतिष शास्रानुसार तुळशीच्या माळेसंदर्भात काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक नियम म्हणजे ती माळ सतत काढून ठेवून नये. ती एकदा घातल्यानंतर काढू नये. असे केल्याने उत्तम फळ मिळण्यास कठीण होते.

-माळेचे शुद्धिकरण गरजेचे
ज्योतिष शास्रात असे मानले गेले आहे की, तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी त्याचे शुद्धिकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शुद्धिकरण करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा. जेव्हा माळ सुकली जाईल तेव्हा ती घाला. असे केल्याने माळेचे शुद्धिकरण होते. (Tulsi Mala)

Tulsi mala - Vrindavan

-रुद्राक्ष घालणाऱ्यांनी ही माळ घालू नये
ज्या व्यक्तीने तुळशीची माळ घातली आहे त्याने चुकूनही रुद्राक्षाची माळ घालू नये. असे केल्याने त्याचा उलट प्रभाव होतो.

-नॉन-वेज खाणाऱ्यांनी ती घालू नये
जर तुम्ही तुळशीची माळ घालण्याचा विचार करत असाल तर मांस-मदिराचे सेवन करू शकत नाहीत. जी लोक तुळशीची माळ घालतात ते केवळ सात्विक जेवण करू शकतात. त्याचसोबत अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ सुद्धा खाऊ शकत नाहीत.

-गर्भवती महिलांनी घालू नये
ज्योतिष शास्रानुसार गर्भवती महिलांनी तुळशीची माळ घालू नये. खासकरुन सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत ही घालू नये. याचा बाळावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा- घरातील वास्तुदोष ‘या’ उपायांनी करा दूर

-सूतक काळात माळ घालू नये
कोणत्याही प्रकारच्या सूत काळात तुळशीची माळ घालू नये. सूतकानंतर जेव्हा पुन्हा ती घालाल तेव्हा ती गंगाजलाने शुद्ध करूनच घालावी.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....