Home आरोग्य झोपेत श्वास फुलल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक, असा करा बचाव
आरोग्य

झोपेत श्वास फुलल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक, असा करा बचाव

8
heart attack
heart attack

जगभरात सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकने होतात. डब्लूएचओच्या मते, २०१९ मध्ये विविध आजारांमुळे जवळजवळ ६ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. यापैकी १५ टक्के मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाले होते. गेल्या दोन दशकात हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ होत आहे. कोविडच्या महासंकटानंतर सर्वाधिक प्रकरणे ही हार्ट अटॅकची समोर येत आहेत. तरुणांपासून ते मुलांना हार्ट अटॅक येत आहे. मात्र तु्म्हाला माहितेय का, रात्री झोपेत सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. या दरम्यान जर वेळीच उपचार न मिळल्यास मृत्यू ओढावू शकतो. अशातच असा प्रश्न उपस्थितीत होते की, झोपेत हार्ट अटॅक कसा येऊ शकतो आणि असे का होते? याच बद्दल एक्सपर्ट्स काय म्हणतात हे पाहूयात. (Heart Attack)

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, रात्री झोपेत सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेह, हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाची समस्या असते त्यांच्यामध्ये याची रिस्क अधिक असते. काही लोकांचे रात्रीच्या वेळी बीपी वाढले जाते. हार्टला बीपी मेंन्टेन करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. यामुळे हार्टवर प्रेशर वाढते. अधिक दबाव पडल्याने हृदयाची काम करण्याची क्षमता प्रभावित होते आणि हार्ट अटॅक येतो.

heart attack
heart attack

या व्यतिरिक्त एक्सपर्ट्स असे सांगतात, रात्रीच्या वेळी जर श्वास घेण्यास समस्या येत असेल तर ते हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. श्वास घेण्याच्या समस्येसह जर घाम ही येत असेल तर अशा स्थितीत लगेच रुग्णालयात जावे. रात्री झोपेत हार्ट अटॅक आल्यास तर त्याची लक्षणं सुद्धा दिसतात. अचानक छातीत दुखणे आणि घाम येऊ लागतो. काही लोकांच्या डाव्या हातात आणि खांद्यात खुप दुखण्यास सुरुवात होते.अशी लक्षण दिसल्यानंतर ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते. (Heart Attack)

हेही वाचा- Home Remedies for Migraine Headache: मायग्रेनच्या वेदनेने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

तसेच क्रोनिक ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप एपनियाच्या कारणास्तव ही हार्ट अटॅक येऊ शकते. हा एक झोपेसंदर्भातील आजार आहे. यामध्ये पीडित रुग्णाच्या शरिरात रात्रीच्या वेळी बीपी वाढला जातो जे हार्ट अटॅकचे कारण ठरु शकतो. झोपेत हार्ट अटॅक येण्याची रिस्क अशा कारणास्तव असते की, झोपताना स्नायू रिलॅक्स असतात. मात्र मानेच्या आजूबाजूला असलेले काही टिश्यू अधिक अॅक्टिव्हहोतात. यामुळे रिस्पिरेटरी ट्रॅक्टवर ही प्रभाव पडतो आणि श्वास घेण्यास समस्या उद्भवते. यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. याचा थेट परिणाम हार्ट फंक्शनवर होतो. त्यामुळे अशा समस्येपासून दूर राहण्यासाठी बीपी नियंत्रणात असावा आणि दररोज थोडा वेळ तरी व्यायाम करावा असा सल्ला दिला जातो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...