Home गाजावाजा स्पेशल G20 म्हणजे नक्की काय, भारताकडे किती वर्ष असणार अध्यक्षपद?
गाजावाजा स्पेशल

G20 म्हणजे नक्की काय, भारताकडे किती वर्ष असणार अध्यक्षपद?

10
G20
G20

२०२३ मध्ये भारतात जी२० चे विविध शहरात वेगवेगळे समिट सुरू आहेत. या अंतर्गत जी२० च्या बैठका या येत्या डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र तुम्हाला माहितेय का, भारताकडे जी२० (G20) चे अध्यक्षपद किती वर्ष असणार? त्यानंतर पुढे याचे अध्यक्षपद कोणाला दिले जाईल? याच बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.

जी २० म्हणजे जगातील २० देश. ज्यामध्ये मुख्यत्वे २० देशांचे आर्थित मंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर्सचा एक ग्रुप असतो असे मानले जाते. त्यामध्ये १९ देश आणि युरोपीय देशांचा समावेश आहे. यंदा जी२० चे अध्यक्षपद आहे. जी२० शिखर संम्मलेन ९-१० डिसेंबर दिल्लीत होणार आहे. तेव्हा औपचारिकरित्या घोषणा केली जाईल की, पुढील कोणत्या देशाला याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

कोणकोणत्या देशांचा समावेश?
अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कनाडा, चीन, यूरोपीय संघ, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मैक्सिको, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम और संयुक्त राज्य अमेरिका यांचा समावेश आहे. स्पेन स्थायी अतिथी असून त्याला प्रत्येक वर्षी आमंत्रित केले जाते.

G20
G20

भारताकडे डिसेंबर पर्यंत असणार नेतृत्व
भारत ३० डिसेंबर पर्यंत जी२० चे नेतृत्व करणार आहे. याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. त्यानंतर भारताचा नेतृत्व करण्याचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. डिसेंबर मध्ये होणाऱ्या शिखर संम्मेलनाव्यतिरिक्त आपण पाहतोय की, या संघटनेच्या अंतर्गत संपूर्ण मंत्र्यांच्या बैठका, शेरपा बैठका, कार्य समूह आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. एकूणच भारताला एक वर्ष जी२० चे नेतृत्व करता येणार आहे.

जी२० (G20) मध्ये दोन समांतर ट्रॅक असतात. एक म्हणजे आर्थिक ट्रॅक आणि दुसरा शेपरा ट्रॅक. अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आर्थिक ट्रॅकचे नेतृत्व करतात. तर शेरपा ट्रॅकचे नेतृ्त्व हे शेरपा करतात.

जगातील मोठ्या अर्थव्यवस्था एकत्रित येतात
मुख्यत्वे जी२० जगातील प्रमुख आणि व्यवस्थित रुपात महत्त्वपूर्ण अर्थवस्थांना एकत्रित आणते. याचे सदस्य जागतिक जीडीपीच्या 85%, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 75% आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश प्रतिनिधित्व करतात. या ग्रुपचे कोणतेही स्थायी सचिवालय नाही.

पुढील वर्षात या देशाकडे असू शकते नेतृत्व
भारतापूर्वी २०२२ मध्ये इंडोनेशियाकडे जी२० चे अध्यक्षपद होते. त्यानंतर २०२३ मध्ये भारताकडे ही जबाबदारी आहे. तर पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये ब्राजील जी२० चे नेतृत्व करू शकतो. २०२५ मध्ये दक्षिण अफ्रिकेवर ही जबाबदारी असू शकते.

हेही वाचा- नरेंद्र मोदी आजचे आणि 2005 चे…

कधी झाली होती स्थापना
जी२० ची स्थापना ही १९९९ आशियाई आर्थिक संकटानंतर अर्थमंत्र्यांनी आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरयांनी जागतिक स्तरावर आर्थिक आणि त्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एका मंचाच्या रुपात याची स्थापना केली होती.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....