Home गाजावाजा स्पेशल तुमच्या नात्यात Ego येतोय ‘या’ संकेतांवरून ओळखा
गाजावाजा स्पेशल

तुमच्या नात्यात Ego येतोय ‘या’ संकेतांवरून ओळखा

9
Ego in relationship
Ego in relationship

नाते तेव्हाच दीर्घकाळ टिकते जेव्हा त्यामध्ये एकमेकांच्या भावनांचा, प्रेमाचा आदर केला जातो. जेव्हा ही भावना नात्यात असते तेव्हा नाते दीर्घकाळ टिकते. त्याचसोबत दोघांना एकमेकांसोबत घट्ट बांधून ठेवणारा धागा म्हणजे नात्यात असणारा एकमेकांवरील विश्वास. हा विश्वास नसेल किंवा पार्टनरने तो मोडला गेला तर नाते फार काळ टिकत नाही. त्याचसोबत काही रिलेशनशिपमध्ये असे ही पहायला मिळते की, एकाच पार्टनरकडून नाते दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी समोरच्या पार्टनरच्या भावनांना सुद्धा फारसे महत्त्व दिले जात नाही. स्वत:चाच विचार केला जातो. असे नाते फारकाळ टिकत नाही, ते मोडले जाते. अशातच तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये आहात तेथे तुम्हाला किती महत्त्व दिले जातेय आणि त्यामध्ये पार्टनरचा इगो तर मधे येत नाही ना हे कसे ओळखयाचे याच बद्दल जाणून घेऊयात. (Ego in relationship)

केवळ आपल्याच गरजांना महत्त्व देणे
जर रिलेशनशिपमध्ये आहात तर पार्टनरच्या बोलण्याकडे, त्यांच्या भावनांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा पहावे. मात्र केवळ आपल्याच गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतील याचा विचार करुन त्याला अधिक महत्तव देऊ नका. अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तींचे ऐकून सुद्धा घेत नाहीत.

बोलणे कमी होणे
एखाद्या रिलेशनशिपमध्ये संवाद असेल तर सर्वकाही गोष्टी स्पष्ट असतात. काहीही लपवले जात नाही. मात्र तुमचा पार्टनरल कालांतराने तुमच्याशी बोलणे कमी करतो तर हा संकेत इगोचे सुद्धा असू शकते.

पार्टनवर जळणे
जर तुमच्यामध्ये एकमेकांबद्दल मनात जळफळाट असेल तर हे कारण तुमच्या नात्यात इगोची वृत्ती अधिक वाढवू शकते. खरंतर ही एक सामान्य भावना आहे. मात्र नात्यात टॉक्सिक भावना अधिक येऊ लागल्या तर नाते मोडले जाते. यावर उपाय असा पार्टनरशी संवाद साधून सर्वकाही स्पष्ट करा.

अहंकाराची वृत्ती असणे
नात्यातील ही एक सर्वाधिक मोठी समस्या आहे. सर्वसामान्यपणे ही समस्या तेव्हा सुरु होते जेव्हा पार्टनर हा समोरच्या पार्टनरपेक्षा स्वत:ला अधिक शहाणा समजू लागतो. आपले बोलणे पटवून देण्यासाठी पार्टनर काहीही करू शकतो. (Ego in relationship)

हेही वाचा- वयाने मोठ्या असलेल्या पार्टनरला डेट करताना असे सांभाळा नाते

माफी मागायला लाज वाटणे
पार्टनरची माफी मागणे किंवा माफ करण्यास जर तुम्ही नकार देत असाल तर हे नात्यात इगोचे कारण ठरु शकते.अशातच स्वत:ला विचारा नक्की समस्या काय आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....