Home आरोग्य खाद्यपदार्थांवरील Expiry Date नंतर खरंच पदार्थ खराब होतात का?
आरोग्य

खाद्यपदार्थांवरील Expiry Date नंतर खरंच पदार्थ खराब होतात का?

6
Expiry Date on products
Expiry Date on products

जेव्हा आपण बाजारातून एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा त्यावर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. म्हणजेच ती वस्तू त्याच तारखेपर्यंत वापरण्यायोग्य असते. परंतु काही लोकांना रिस्क घेण्याची फार हौस असते. त्यांचे असे मानणे असते की, एक्सपायरी तारीख अशा कारणास्तव लिहिली जाते जेणेकरुन प्रोडक्ट लवकरात लवकर खरेदी करावे. त्यांचा असा दावा असतो की, असे प्रोडक्ट्स एक्सपायरी डेट नंतर सुद्धा खाल्ले जाऊ शकतात. परंतु खरंच एक्सपायरी डेट नंतर पदार्थ खाता येतात का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Expiry Date on products)

खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट गरजेची का?
आपण जे पदार्थ खातो त्यावर युज बाय डेट, बेस्ट बिफोर च्या रुपात एक्सपायरी डेट लिहिलेली असते. याचा अर्थ असा असतो की, या फूड्समधील पोषक तत्वांची क्वालिटी एक्सपायरीपूर्वी बेस्ट असते. म्हणजेच अशी गॅरेंटी दिली जाते की, ते पदार्थ एक्सपायरी डेटपूर्वी खाल्ल्यास काही नुकसान होत नाही आणि याची गुणवत्ता उत्तम असते. एक्सपायरी डेच ही पदार्थांची गॅरेंटी आणि गुणवत्ता सांगते. यामध्ये दूध, दूधाचे पॅकेट, अंडी, मासे आणि पॅकेटमध्ये येणाऱ्या भाज्यांचा समावेश. त्याचसोबत फास्ट फूड आणि चिप्सवर सुद्धा युज बाय डेट, बेस्ट बिफोर लिहिलेले असते.

एक्सपायरी डेटनंतर सुद्धा पदार्थ खाल्ल्यास इंफेक्शनचा धोका असतो. ज्या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते जसे की, दूध, मांस आणि मासे ते लवकर घराब होण्याची रिस्क अधिक असते. ज्या पदार्थांमध्ये पाण्याची कमतरता असते जसे की अंडी, ब्रेड ते खराब होण्याची रिस्क कमी असते. या खाद्यपदार्थांत बॅक्टेरिया, फंगस आणि वायरसचे संक्रमण होऊ शकते.

एक्सपायरी झालेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास फूड पॉइजनिंगची समस्या उद्भवू शकते. फूड पॉइजिनिंग मध्ये उलटी होणे, ताप येणे, पोट दुखी अशा समस्या होऊ शकतात. एखाद्याला अशा समस्या न होता केवळ उलटीच होत राहते. सर्वसामान्यपणे सामान पाहूनच कळते की, ते एक्सपायर झाले आहे. जसे की, पदार्थ सडल्याचा वास येणे, टेस्ट बिघडणे किंवा रंग बदलणे. (Expiry Date on products)

दरम्यान काही खाद्य पदार्थ असे असतात जे एक्सपायरी डेट नंतर सुद्धा खाता येतात. परंतु आधी हे तपासून घ्यावे की, ते सडलेले नाहीत. खाद्य पदार्थांत पोषक तत्वांची क्वालिटी केवळ एक्सपायरी डेट पर्यंतच असते. एक्सपायरी डेटनंतर खाद्य पदार्थांमधील पोषक तत्वांची क्वालिटी कमी होऊ लागते. जे खाल्ल्याने केवळ पोट भरते. पण शरिराला काहीच फायदा होत नाही.

हेही वाचा- उन्हाळ्यात उसाचा रस पित असाल तर आधी ‘हे’ वाचा

कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
अशा प्रकारचे सामान खरेदी करण्यापूर्वी ते व्यवस्थितीत शिजवून घ्या. न शिजवलेले पदार्थ खाल्ल्याने समस्या उद्भवू शकतात. खाद्य पदार्थ उत्तम वातावरणात ठेवावे. जसे की, फ्रिज मध्ये ठेवल्या जाणाऱ्या गोष्टी त्यामध्येच ठेवा. जर एखादा पदार्थ उघडल्यानंतर तो एक्सपायरी डेट पर्यंतच खाल्ला पाहिजे असे लिहिले असेल तर त्याआधी तो संपवला पाहिजे. फळं ही स्वच्छ धुवून खावीत. खाद्य पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासून घ्यावी.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...