Home गाजावाजा स्पेशल अमेरिका सध्या बदलत्या हवामानाच्या फटक्यानं हैराण
गाजावाजा स्पेशल

अमेरिका सध्या बदलत्या हवामानाच्या फटक्यानं हैराण

7
America
America is currently reeling under the brunt of climate change marathi info

जगातील सर्वात शक्तीशाली देश म्हणून ओळख असलेला अमेरिका (America) सध्या बदलत्या हवामानाच्या फटक्यानं हैराण झाला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गेल्या काही महिन्यात वादळांनी हाहाकार उडवला होता. आता फ्लोरिडामध्ये आलेल्या भयंकर वादळांनं तशीच परिस्थिती निर्माण केली होती. त्यातच अमेरिकेतील (America) एका भागात प्रचंड उष्मा वाढत आहे. अशा परिस्थितीत एसीशिवाय राहणंही तेथील नागरिकांना जीवघेणे पडत आहे.  विशेषः वृद्धांना या उष्णतेचा फटका बसत असून काही ठिकाणी बंद घरामध्ये वृद्धांचे मृतदेह सापडल्यानं चिंता वाढली आहे. अमेरिकेत अ‍ॅरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात उष्णतेची लाट आली आहे.  गेल्या वर्षीही या भागातील उष्णता अधिक होती. त्यामुळे आता या भागात स्थानिक प्रशासनातर्फे वृद्धांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहे.  

अमेरिकेत (America) उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. येत्या काही वर्षात उष्णतेमुळे मृत्युंचे प्रमाण वाढण्याचा धोका हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. या मृत्यूंपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त मृत्यू हे मानवी कारणामुळे झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे होऊ शकतात, असे निदान काढण्यात आले आहे. अमेरिकेत अ‍ॅरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात सध्या उष्णतेची लाट आली असून यामुळे तेथील स्थानिकांना, विशेषतः वृद्धांना मोठा त्रास होत आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम अॅरिझोनामधील लोकांवर होत आहे. येथे गेल्या वर्षी उन्हाळ्यात काही वृद्ध माणसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर व्यक्ती एकटा राहत असून उष्णतेमुळे तो बेशुद्ध पडला होता. अशाच काही घटना झाल्यावर प्रशासनानं तपासणी केली असता असे आढळले की, या व्यक्तींकडे वातावरण संतुलित ठेवणारे यंत्र नसल्याचे किंवा खराब झाले होते. या भागात गेल्या वर्षी पारा 37 अंशाच्या पार गेला होता. मात्र चिंतनीय गोष्ट अशी आहे की, यावेळी एप्रिल महिन्यात हा पारा चाळीशी पार झाला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात उष्मा अधिक वाढेल असे अनुमान हवामान तज्ञांनी काढले आहे. अशा परिस्थितीत घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अमेरिकेत उष्णतेच्या लाटेमुळे 77 जणांना जीव गमवावा लागला होता. आतापर्यंत फिनिक्सपुरती मर्यादित असलेली ही उष्णतेची  वाढ अन्य शहरातही होत असल्यानं अमेरिकेच्या (America) सर्वच शहरांवर धोक्याची घंटा वाजू लागली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि या बदलत्या हवामानामुळे वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी नवीन आव्हान निर्माण झाले आहे. पॅसिफिक नॉर्थवेस्ट ते शिकागो ते नॉर्थ कॅरोलिना,  येथील दवाखान्यात उष्णतेच्या लाटेमध्ये आजारी झालेल्यांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ज्या घरात वृद्ध एकटे राहत आहेत, तेथे जाऊन आरोग्य कर्मचारी त्यांना आवश्यक सूचना देत आहेत. यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच या भागात तापमान चाळीशी पार गेला होता.  एवढे तापमान म्हणजे येथे उच्चांकी मानले गेले. 

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लिओनार्ड डेव्हिस स्कूल ऑफ जेरोन्टोलॉजीमध्ये आता या वाढत्या उष्णतेबाबत संशोधन करण्यात येत आहे. जग झपाट्याने बदलत आहे आणि हवामानाची तिव्रता वाढत आहे, यावर येथे संशोधन होत असून वाढत्या हवामानामुळे मानवाला भविष्यात मोठा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार दरवर्षी अमेरिकेत उष्णेतमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हवामान बदलामुळे जवळपास 200 अमेरिकन शहरांमध्ये एका वर्षात 1,100 हून अधिक मृत्यू झाले आहेत. सध्या, फिनिक्ससह अनेक अमेरिकेतील शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. अशा परिस्थितीत अधिक काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.  

=========

हे देखील वाचा : वैज्ञानिकांना पृथ्वीवर कोठे आढळला ९०० फूट खोल रहस्यमयी ब्लू होल?

=========

दरम्यान अमेरिकेच्या (America) काही भागात धुळीच्या वादळाने कहर केला. धुळीच्या वादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. धुळीच्या वादळामुळे हायवेवरील दृश्यमानता कमी झाली होती, त्यामुळे सुमारे 100 वाहनांचा अपघात झाला. इलिनॉय राज्याला या वादळाचा अधिक फटका बसला. शिकागो आणि सेंट लुईस सारख्या शहरांना जोडणा-या रस्त्यावर धुळीच्या वादळांमुळे वाहनांना अपघात झाले. यामध्ये 35 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याआधी फ्लोरिडामध्ये एका शक्तिशाली वादळाने कहर केला होता.  वादळामुळे झालेल्या विध्वंसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.  अनेक वाहने पूर्णपणे मोडकळीस आली आहेत.  वादळामुळे गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे.  या वादळात 22 नागरिकांचा बळी गेला आहे.  अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रांतात अशाप्रकारे बदलत्या हवामानाचा फटका बसत असून त्यामुळे हवामानतज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....