Home लाईफ स्टाईल तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल तर ‘या’ टीप्स येतील कामी
लाईफ स्टाईल

तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल तर ‘या’ टीप्स येतील कामी

9
Low self-esteem
Low self-esteem

तुमच्यामधील आत्मविश्वास हा तुमचे सौंदर्य उजळवतेच पण तुम्ही साकारात्मक विचार करण्यास भाग पाडतो. अशातच बोल्ड आणि कॉन्फिन्डेंट पर्सनालिटी आपली सुद्धा असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. पण काही लोकांचा स्वत: वर विश्वास नसतोच किंवा कमी झालेला असतो. अशातच आत्मविश्वास कमी होण्यामागे कही कारणं असू शकतात. (Low self-esteem)

आत्मविश्वास हा प्रत्येकालाच आनंदी आयुष्य जगण्याचे खरं सीक्रेट असल्याचे मानले जाते. पण काही लोकांचा आत्मविश्वास एखाद्या गोष्टीमुळे ढासळू शकतो. ती कोणतीही असो घरातील टेंन्शन असो किंवा नोकरीचे टेंन्शन. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर ही होतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा कमी झालेला आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कॉन्फिडेंट पर्सनालिटी बनू शकता.

-स्वत: बद्दल संशय निर्माण करु नका
काही महिलांना आपण काहीच करु शकत नाही असे वाटते. यामुळेच त्यांचा आत्मविश्वास ढासळला जातो. पण स्वत:वरच विश्वास नसेल तर तुम्ही कोणत्याच गोष्टी परफेक्ट करु शकत नाहीत. त्यात चुका होत राहतात. त्यामुळे स्वत:वर संशय व्यक्त करु नका. नेहमीच तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे लक्ष द्या.

-चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेवा
काही वेळा लोक स्वत:कडून खुप अपेक्षा ठेवतात. पण आपल्या त्याच अपेक्षा पूर्ण न झाल्यास आत्मविश्वास कमी होतो. यामुळेच ज्या गोष्टी होणार आहेत त्यावर विश्वास ठेवा आणि तुमची क्षमता काय आहे हे सुद्धा ओळखण्यास शिका. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही.

-नकारात्मक भावनेपासून दूर रहा
नकारात्मक विचार, भावनांपासून दूर रहा, कारण बऱ्याच वेळा असे होते या गोष्टीमुळे ही तुमचा आत्मविश्वास कमी होतो. या व्यतिरिक्त याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर ही होतो. त्यामुळे कधीही स्वत:बद्दल नकारात्मक बोलू नका.(Low self-esteem)

-प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास घेऊन जा
काही महिला मोठे टास्क पाहून घाबरतात. पण आत्मविश्वासाने त्याला सामोरे गेल्यास तर सर्वाकाही साध्य होऊ शकते हे लक्षात ठेवा. नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती किंवा तुम्ही स्वत: त्यापासून दूर रहा. तु्म्हाला दिलेले प्रत्येक काम पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्या.

हे देखील वाचा- चुक झाल्यास पालकांनी मुलांची माफी मागावी का? सॉरी बोलण्याची योग्य पद्धत घ्या जाणून

-परखडपणे तुमची बाजू मांडा
आत्मविश्वास कमी होण्यामागे काही कारणं असू शकतात. त्यामुळेच बहुतांश महिला आपले बोलणे परखडपणे मांडत नाहीत. यामुळेच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी तुम्ही इतरांसमोर नको असलेल्या गोष्टी सुद्धा बोलता. पण असे होण्यापासून दूर रहा. तुम्हाला जे काही वाटते ते मोकळेपणाने बोला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला जाईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....