Home लाईफ स्टाईल लग्नापूर्वी पार्टनरला विचारा हे प्रश्न, वैवाहिक आयुष्य राहिल आनंदित
लाईफ स्टाईल

लग्नापूर्वी पार्टनरला विचारा हे प्रश्न, वैवाहिक आयुष्य राहिल आनंदित

10
Relationship Tips
Relationship Tips

आयुष्यात लग्नाचा निर्णय हा फार महत्वाचा मानला जातो. अशातच बहुतांश लोक या बद्दल खुप विचारपूर्वक निर्णय घेतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, लग्नानंतरच्या अशा काही गोष्टी तुमच्या वैवाहित आयुष्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच लग्नापूर्वी तुम्ही पार्टनरला अशा काही गोष्टी विचारा ज्यामुळे तुमचे पुढील वैवाहिक आयुष्य हे आनंदित राहिल. (Relationship Tips)

लग्नापूर्वी सध्या कपल्स एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच सध्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ही काही कपल्स राहतात. या दरम्यान ते एकमेकांना जाणून घेतातच पण आपला पार्टनर आपली आयुष्यभर काळजी कशी घेईल हे सुद्धा पाहतात. या नात्यात जर तुमचे पटले नाही तर पुढील आयुष्य अशा व्यक्तीसोबत कसे घालवायचे असा विचार करुन नाते मोडतात ही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलो म्हणजे लग्न केलेच पाहिजे असे होत नाही. परंतु काही लोक असे ही करतात पार्टनरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच तुमच्या नात्यात कालांतराने वाद होऊ शकतात. अशातच पुढील काही रिलेशनशिप्सच्या टीप तुमच्या कामी येतील.

-पार्टनरच्या सहमतीने लग्न करा
काही वेळेस लोक ही लग्नासाठी पूर्णपणे तयार नसतात. पण फॅमिलीच्या प्रेशरमध्ये काहीजण लग्न सुद्धा करतात. त्यानंतर मात्र समस्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळेच पार्टनरचा लग्नासंदर्भातील विचार ऐकून घ्या आणि त्यानंतरच पुढील पाऊल उचला.

-नोकरीबद्दल विचारा
लग्नानंतर काही लोकांना आपले करियर सोडून दुसरेच काहीतरी करावे लागते. त्यामुळेच लग्न करण्यापूर्वी पार्टनरसोबत करियरबद्दल चर्चा करा. त्याचसोबत पार्टनरचे लक्ष्य आणि नोकरी बद्दलची अधिक माहिती जाणून घ्या. या व्यतिरिक्त लग्नानंतर जरी तुम्ही नोकरी केली तरीही त्याला काही समस्या नसावी हे सुद्धा विचारा.

-फॅमिली प्लॅनिंग करा
लग्नासाठी उत्सुक असलेल्या कपल्सने फॅमिली प्लॅनिंग करण्याचा विचार सोडून देतात. परंतु लग्नांतर परिवारातील लोक तुम्हाला नोकरी सोड किंवा बाळाला जन्म देण्यासाठी दबाव टाकतात. यामुळेच पार्टनरशी तुमच्या फॅमिली प्लॅनिंग बद्दल ही जरुर विचारा. (Relationship Tips)

हे देखील वाचा- तुम्ही चुकीच्या व्यक्तीला तर डेट करत नाही ना? ‘या’ संकेतांनी काढा शोधून

-जुन्या नात्यांबद्दल आधीच सांगा
लग्नानंतर एखाद्या नवऱ्याने अथवा बायकोने पार्टनरशी कोणत्याही गोष्टी लपवू नये. अशातच लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला एक्स नात्याबद्दलच आधीच सांगा. जेणेकरुन पुढे जाऊन या कारणामुळे तुमच्या दोघांत वाद होऊ नये.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....