Home लाईफ स्टाईल तुमची मुलं शिव्या देण्यास शिकले असतील तर पालकांनी ‘या’ गोष्टी जरुर करा
लाईफ स्टाईल

तुमची मुलं शिव्या देण्यास शिकले असतील तर पालकांनी ‘या’ गोष्टी जरुर करा

11
Parenting tips
Parenting tips

मुलांचे मन हे नाजूक असते. त्यांना एखादी गोष्ट पटकन कळत नाही. त्यामुळेच ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून काही ना काहीतरी शिकत राहतात. अशातच पालकांना नेहमीच वाटत राहते की, त्यांच्या मुलाने चांगल्या मित्रांशी संगत करावी. परंतु जर तुमचे मुलं शिव्या देण्यास शिकले अथवा वाईट भाषेचा आपल्या बोलण्यात वापर करु लागले तर पालकांनी वेळीच अलर्ट व्हावे. (Parenting tips)

मुलांना काहीच कळत नसल्याने ते आपण जे करतोय, बोलतोय तेच पाहून ते शिकत असतात. अशातच पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की, मुलांसमोर कसे वागावे. जर तुम्ही अथवा तुमच्या परिवाराव्यतिरिक्त तो अशा व्यक्तींच्या सहवासात राहत असतील जे वाईट शब्दांचा वापर करतात तर त्यांना सुद्धा तशीच सवय लागू शकते. अशताच काही सोप्प्या पर्यायांनी तुम्ही त्यांची ही सवय सुधारु शकता. अशातच पालकांनी यावेळी नक्की काय करावे याबद्दल सांगणार आहोत.

-वेळीच थांबवा
जर तुमचे मुलं तुमच्या समोर वाईट भाषेचा अथवा अपशब्द वापरत असेल तर त्याला वेळीच थांबवा. अशातच त्यांना प्रेमाने समजवून सांगा असे करु नये. त्यांना सांगावे चांगली मुलं असे करत नाही आणि ते सर्व बोलणे त्यासाठी बरं नव्हे.

-मित्रपरिवारावर लक्ष ठेवा
जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या मुलाने शिव्या देणे सोडावे तर त्याचे मित्र नक्की कोण आहेत त्यावर लक्ष ठेवावे. यामुळे तुम्हाला कळेल की, अखेर त्याचा फ्रेंड सर्कल किती चांगला आहे की वाईट. वाईट संगतीपासून तुमच्या मुलाला नेहमीच दूर ठेवा.

Parenting tips
Parenting tips

-चांगल्या-वाईट मधील फरक समजवून सांगा
मुलं ही निरागस असतात. त्यांना चांगल आणि वाईट मधील फरक कळत नाही. अशातच पालकांची जबाबदारी आहे की, त्यांना चांगल काय आणि वाईट काय यामधील फरक समजावून सांगण्याची. त्यांना हे सुद्धा सांगा की, वाईट लोकांसोबत राहिल्याने काय होऊ शकते.(Parenting tips)

-रोल मॉडेल व्हा
मुलांसाठी आपले पालक रोल-मॉडेल असतात. अशातच पालकांनी मुलांसमोर अशा कोणत्याही भाषेचा वापर करु नये ज्यामुळे मुलगा तुमचे ऐकून तेच बोलेल. कारण मुलं तिच भाषा बोलतात जे त्याचे पालक बोलत असतात.

हे देखील वाचा- मुलांना लहानपणापासून बचत करण्याची सवय लावण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

-शिव्यांचा अर्थ विचारा
जर तुमचे मुलं अपशब्दांचा वापर करत असेल तर त्याला त्या शिव्यांचा अर्थ विचारा, तसेच त्याने हे कोणाकडून ऐकले किंवा शिकलेय हे सुद्धा विचारा. या व्यतिरिक्त मुलाच्या मित्राला सुद्धा समजावून सांगा की, असे करु नको.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....