Home गाजावाजा स्पेशल जेनिफर लोपेझचा दमदार ‘द मदर’
गाजावाजा स्पेशल

जेनिफर लोपेझचा दमदार ‘द मदर’

10
The Mother
Jennifer Lopez's powerful 'The Mother' marathi info

अमेरिकन गायिका, अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेनिफर लोपेझचा नवा लूक तिच्या चाहत्यांना लवकरच बघता येणार आहे. जेनिफर लोपेझचा दमदार अभिनय असलेला ‘द मदर’ हा चित्रपट ओटीटी माध्यमावर येत आहे.  ‘द मदर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘द मदर’ हा एक ॲक्शनपट असून जेनिफरच्या दमदार अभिनयाची झलक ट्रेलरमधून दिसत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 12 मे 2023 प्रदर्शित होत आहे.  

गायिका, अभिनेत्री, व्यावसायिक आणि नृत्यांगना अशा विविध रुपात जेनिफर लोपेझची ओळख आहे. आता हिच जेनिफर लोपेझ दमदार ॲक्शनपट घेऊन तिच्या चाहत्यांपुढे आली आहे. तिच्या ‘द मदर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यात आपल्या मुलीसाठी प्रसंगी युद्ध करण्यासही तयार असलेल्या आईची भूमिका तिनं पार पाडली आहे. ‘द मदर’ हा एक आगामी अमेरिकन ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन निकी कॅरो यांनी केले आहे.  द मदरची पटकथा मिशा ग्रीन, आंद्रिया बर्लॉफ आणि पीटर क्रेग यांनी तयार केली आहे. चित्रपटात जेनिफर लोपेझ सोबत जोसेफ फिएनेस, ओमारी हार्डविक आणि गेल गार्सिया बर्नाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘द मदर’च्या माध्यमातून जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. हॉलिवूडची आयकॉन म्हणून गौरवललेली जेनिफर लोपेझ अॅक्शन थ्रिलर ‘द मदर’सह मोठ्या पडद्यावर येत आहे. द मदरचा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर जेनिफरचे चाहते खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटात, जेनिफर लोपेझने एका प्राणघातक मारेकर्‍याची भूमिका केली आहे. त्यात ती मारेकरी असली तरी आई आहे. तिच्या मुलीवर जेव्हा संकट येतं तेव्हा ती त्या संकटाला सामोरी जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करते. मारामारी करते,  बंदूक चालवते आणि आपल्या मुलीला वाचवते. ‘द मदर’च्या ट्रेलरमध्ये जेनिफरच्या खतरनाक स्टाइलची झलक पाहायला मिळते. ‘द मदर’चा ट्रेलर 2.30 मिनिटांचा आहे.  चित्रपटात जेनिफर लोपेझने एका माजी मारेकरीची भूमिका केली आहे.  आपल्या लाडक्या मुलीचे रक्षण करण्यासाठी ती आपला व्यवसाय आणि अगदी कुटुंब देखील सोडते.  ट्रेलर दाखवण्यात आले आहे की, जेनिफर तिच्या मुलीपासून दूर रहाते, त्यातून ती मुलीला सुरक्षित जीवन देऊ शकेल.  पण तिच्यावर हल्ला करणारे मारेकरी मग तिच्याच  12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करतात. मग आपल्या मुलीला शोधण्यासाठी आणि मग तिला शोधल्यावर गुन्हेगारांपासून तिला वाचवण्यासाठी ती आहे सर्व गुन्हेगारांसमोर उभी राहते.  

=======

हे देखील वाचा : नीतू कपूर विरुद्ध कतरीना कैफची आई सुझान या युद्धाची चर्चा

=======

जेनिफर लोपेझच्या कारकीर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. 2021 मध्येच या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र त्यानंतर अनेक कारणांनी हा चित्रपट रेंगाळला गेला. यात कोरोनाचे कारणही प्रमुख होते.  मध्यंतरी जेनिफर या चित्रपटासाठी उत्सुक नसल्याची बातमी आली.  मात्र द मदरचा दमदार ट्रेलर पाहून या सर्व वावड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेनिफर लोपेझ हॉलिवूडची सूपरस्टार आहे.  सेलेना या चित्रपटापासून ती मोठ्यापडद्यावर आली. एका चित्रपटासाठी दशलक्ष पेक्षा जास्त कमावणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.  याशिवाय जेनिफर ही सुप्रसिद्ध गायिका आहे. जेनिफरनं ऑन द 6  या म्युझिक अल्बमसह संगित क्षेत्रात पदार्पण केलं.  त्यानंतर गाण्यासोबत अभिनय आणि स्वतंत्र उद्योजिका म्हणून जेनिफरनं आपली दबदबा वाढवला आहे. हॉलिवूडमधील तिच्या योगदानाबद्दल तिला बिलबोर्ड आयकॉन पुरस्कार आणि मायकेल जॅक्सन व्हिडिओ व्हॅनगार्ड पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय जेनिफर यशस्वी उद्योजिकाही आहे.  सौदर्यप्रसाधनांचा तिची कंपनी असून यासोबत तिचा कपड्यांचाही ब्रॅन्ड आहे. अनेक धर्मदाय संस्थांबरोबरही जेनिफर जोडली गेली आहे.  आता हिच जेनिफर पुन्हा अनेक वर्षाच्या अंतरानं द मदर सारख्या दमदार चित्रपटात दिसणार आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....