Home आरोग्य गृहमंत्री अमित शहा यांचा प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
आरोग्यराजकारणराष्ट्रीय

गृहमंत्री अमित शहा यांचा प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

8

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल रात्री पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्यावर उपचार करत असलेल्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी अमित शाह यांना एक दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना काल रात्री पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी अमित शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर एक दोन दिवस उपचार करण्यात येतील, अशी माहिती अमित शाह यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. अमित शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहांना झाला होता कोरोनाचा संसर्गअमित शहा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सामान्यांपासून ते दिग्गजांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १२ दिवसानंतर म्हणजेच १४ ऑगस्टला अमित शहा कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...