Home राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे वर १ एप्रिल पासून टोलचे दर वाढण्याची शक्यता
राष्ट्रीय

महामार्ग आणि एक्सप्रेस वे वर १ एप्रिल पासून टोलचे दर वाढण्याची शक्यता

10
Toll Tax Hike
Toll Tax Hike

राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे वर आता प्रवास करणे येत्या १ एप्रिलपासून थोडे महाग होणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI कडून टोल टॅक्सचा दरात वाढ करण्याची तयारी केली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, टोल टॅक्समध्ये ५-१० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. दरातील हा बदल National Highway Fees (Determination of Rates and Collection) Rules, 2008 च्या नुसार प्रत्येक वर्षी होतो. (Toll Tax Hike)

एबीपी न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, टोल टॅक्सच्या नव्या दराचा प्रस्ताव एनएचएआयच्या सर्व प्रोजेक्ट इंप्लीमेंटेशन युनिट (PIU) कडून २५ मार्च पर्यंत पाठवला जाणार आहे. नवे दर १ एप्रिल पासून रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या मंजूरी नंतर लागू केले जाणार आहेत. रिपोर्टनुसार, कार आणि हलक्या वहानांवर प्रति ट्रिप ५ टक्के अधिक टॅक्स लावण्याची शक्यता आहे. तर अवजड वाहनांसाठी टोल टॅक्स १० टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.

आतापर्यंतचे टोल टॅक्स दर
२०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या दरातील किंमतीत १० रुपे आणि ६० रुपयांची वाढ करत टोल टॅक्स रेंज १०-१५ टक्क्यांनी वाढवला होता. सध्या एक्सप्रेस वे वर २.२९ रुपये प्रति किमीच्या हिशोबाने टोल टॅक्स वसूल केला जात आहे.१३५ किमी लांब, सहापदरी असलेला ईस्टर्न पेरिफेल एक्सप्रेस वे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे वर सुद्धा टोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

मासिक पास
Mint यांच्या एका रिपोर्टनुसार, टोल प्लाजाच्या २० किमी क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या मासिक पासाच्या सुविधेत ही १० टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. नॅशनल रोड फीस रेग्युलेशन २००८ नुसार, युजर फी ही प्लाजाच्या एका विशेष भागात राहणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सूटचे प्रावधान दिलेले नाही. दरम्यान, जर एखादा नॉन-कर्मिशल गाडीचा मालक असेल आणि चार्ज प्लाजाच्या २० किमी अंतराच्या आत राहत असेल तर तो फी प्लाजाच्या माध्यमातून अनलिमिडेट प्रवासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१५ रुपये प्रति महिना दराने मासिक पास घेऊ शकतो.(Toll Tax Hike)

हे देखील वाचा- भारताला मिळणार पहिली हायड्रोजन ट्रेन, जाणून घ्या खासियत

राष्ट्रीय महामार्गावर टोलच्या कलेक्शनमध्ये वाढ
News18 ने आकडेवारीच्या विश्लेषणाच्या हवाल्याने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२२ दरम्यान, नॅशनल हायवेवर जमा करण्यात आलेला टोल ३३,८८१.२२ कोटी रुपये होता. जो गेल्या वर्षाच्या कलेक्शनच्या कमीत कमी २१ टक्यांपेक्षा अधिक होता. २०१८-१९ नंतर देशात नॅशनल हायवेवर जमा केलेल्या टोलची रक्कम १,४८,४०५.३० कोटींच्या एकूण शुल्कासह ३२ टक्क्यांनी अधिक वाढ झाली होती.

रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय यांच्यानुसार, २०२२ मध्ये नॅशनल आणि स्टेट अशा दोन्ही महामार्गांवर फी प्लाजावर फास्टॅगच्या माध्यमातून एकूण टोल कलेक्शन जवळजवळ ५०,८५५ कोटी रुपये किंवा प्रति दिन १३९.३२ कोटी रुपये होता.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

S. L. Bhyrappa
राष्ट्रीय

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा...

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...