Home गाजावाजा स्पेशल होळीच्या वेळी तुमच्या स्मार्टफोनसह गॅजेट्सची अशी घ्या काळजी
गाजावाजा स्पेशल

होळीच्या वेळी तुमच्या स्मार्टफोनसह गॅजेट्सची अशी घ्या काळजी

7
Holi 2023
Holi 2023

होळी हा हिंदू धर्मातील सणांपैकी एक प्रमुख उत्सव आहे. रंगांची उधळण आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणत होळी-रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. भारतात विविध ठिकाणी होळी साजरा करण्याची परंपरा वेगळी आहे. मात्र होळीच्या वेळी जेव्हा रंगांची उधळण केली जाते, तेव्हा आपल्या आरोग्यासह स्मार्टफोन ते गॅजेट्सची ही काळजी घेतली पाहिजे. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमची होळी तुम्हालाच महागात पडेल. तर जाणून घेऊयात होळीच्या वेळी स्मार्टफोनसह गॅजेट्सची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. (Holi 2023)

आपल्या सर्वांना माहिती आहे की, एखादे गॅजेट्स किंवा फोनवर पाणी पडल्यानंतर तो बिघडल्यास कंपन्या वॉरंटीसाठी क्लेम देत नाहीत. त्यामुळे पुढील काही गोष्टी जरुर लक्षात घ्या.

फोन-गॅजेट्सच्या सुरक्षिततेसाठी खरेदी करा ही गोष्ट
होळीच्या वेळी रंग उडवले जातात. त्यामुळे तुमचा फोन, स्मार्टवॉच अथवा इअरबड्स खराब होऊ नये म्हणून तुम्ही फोन किंवा अन्य गॅजेट्सला Zip Lock Bag मध्ये ठेवा. ही बॅग तुम्हाला ऑफलाइन अथवा ऑनलाईन ही खरेदी करता येते.

फोन भिजला असेल तर चुकून ही करु नका हे काम
जर तुमचा फोन चुकून भिजला गेला असेल तर फोन चार्जिंगला लगेच लावू नका. त्या मधील पाणी पुर्णपणे निघू द्या. असे न केल्यास तर तुमचा फोन खराब होण्याची शक्यता असते.

फोनमध्ये पाणी जाण्याची शक्यता
तुमच्या फोनमध्ये पाणी अथवा रंग हे फोनचे पोर्ट्स, ईअरपीस, हेडफोन जॅक, माइक किंवा स्पीकर ग्रिलच्या माध्यमातून जाऊ शकते. यामुळे तुमचा फोन डॅमेज होऊ शकतो. अशातच असे सांगितले जाते की, या ओपन पोर्ट्सला टेपने झाका आणि फोन व्हायब्रेशन मोडवर ठेवावा. जेणेकरुन टेप लावल्यानंतर ही स्पीकर खराब होण्याची शक्यता कमी होते. (Holi 2023)

फोनसोबत ही चूक करणे टाळा
बहुतांश लोक अशी चूक करतात की, फोन भिजल्यानंतर हेयर ड्रायरचा वापर करतात. पण असे करु नये. कारण गरम हवा तुमच्या फोनच्या आतमध्ये गेल्यास त्यामधील नाजूक पार्ट्स खराब होऊ शकतत.

हे देखील वाचा- होळीचे रंग ‘या’ घरगुती उपायांनी घालवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

स्मार्टवॉचसाठी वापरा प्रोटेक्टिव्ह केस
जर तुम्ही होळीच्या पार्टीत स्मार्टवॉच वापरुन जाणार असाल तर वॉचसाठी आधीच प्रोटेक्टिव्ह केस खरेदी करा. खरंतर वॉच हे IP68 रेटिंगसह येतेच. पण होळीचे रंग हे तुमचे वॉच खराब करु शकतात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....