Home गाजावाजा स्पेशल कैलासा नावाच्या देशाची चर्चा….
गाजावाजा स्पेशल

कैलासा नावाच्या देशाची चर्चा….

8
Kailash
Discussion of the country called Kailasa marathi info

जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी एक चेहरा आणि नवा देश दिसला. याबरोबर सर्वत्र खळबळ उडाली असून भारताच्या सोशल मिडीयावर हा नवा देश आणि त्याच्या प्रमुखाबाबत चर्चा सुरु झाली. हा नवा देश म्हणजे कैलासा (Kailash) …आणि त्याच्या प्रमुखाचे नाव आहे नित्यानंद….भारतातून फरार असलेला नित्यानंद यांनी घोषित केलेल्या कैलासाचा प्रतिनिधी जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत दिसला.  नित्यानंद यांनीही कैलासा देशाच्या एका महिला भक्ताने आर्थिक आणि सामाजिक हक्कांसह शाश्वत विकास या विषयावरील चर्चेत संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भाग घेतल्याची माहिती दिली. या कैलासा देशाच्या प्रतिनिधीने नित्यानंद प्रमाणेच पारंपारिक कपडे आणि दागिने परिधान केले होते.  कैलासा या देशाचे प्रतिनिधित्व करणारी विजयप्रिया नित्यानंद ही नित्यानंदाची शिष्या आहे.

नित्यानंद याच्यावर भारतात बलात्कार आणि शिष्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. 2019 मध्ये नित्यानंद देश सोडून पळून गेला. त्यांनी स्वत:चे वेगळे बेट खरेदी केल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्याच बेटाला वेगळ्या देशाचा दर्जा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत या कैलासा (Kailash) देशाला स्थान मिळाले, म्हणजेच आपल्या देशाला जगात मान्यता असल्याचे नित्यानंद यांनी सांगितले आहे.  जिनिव्हा बैठकीपूर्वीच यूएनने कैलासाच्या प्रतिनिधींचे काही अहवाल प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये हिंदूंसोबतच कैलासातील धर्मगुरू नित्यानंद यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय हे अहवाल युएन समितीच्या कैलासाच्या (Kailash) वेबसाइटवरही दाखवण्यात आले होते. कैलासाने युएनला महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत अहवालही सादर केला आहे.  मात्र संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत वेबसाइटवर 193 सदस्य राष्ट्रांमध्ये कैलासाचा (Kailash) समावेश नाही. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या काही मोजक्या अधिवेशनांना प्रतिनिधी पाठवण्यासाठी देशांचा  सदस्य असणे, ही अट लागू होत नाही.  अशाच नियमांतर्गत आत्तापर्यंत या बैठकांना पॅलेस्टाईन आणि बलुचिस्तानचे प्रतिनिधींनीही आपली उपस्थिती लावली आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत कैलासाचा प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावर नित्यानंद यांनी आपल्या देशाच्या, कैलासाच्या (Kailash) नावानं सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या. 

त्यानंतरच हा कैलासा (Kailash) कुठला देश आहे, याची शोधाशोध सुरु झाली.  कैलासाच्या वेबसाइटवर देशाच्या संविधानाशी संबंधित सर्व माहिती तसेच राष्ट्रीय प्राणी नंदी, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आणि राष्ट्रध्वज यांची माहिती दिली आहे. वेबसाईटवर आतापर्यंत हिंदूंवर झालेल्या सर्व अत्याचारांना होलोकॉस्टचे नाव देण्यात आले आहे. यासोबतच कैलासाला (Kailash) जगभरातील विस्थापित हिंदूंनी एकत्र येऊन स्थायिक झालेल्या जुन्या हिंदू संस्कृतीला परत आणणारे राज्य म्हटले गेले आहे. दक्षिण अमेरिका खंडातील त्रिनिदाद आणि टोबॅगोजवळील इक्वाडोरजवळील एका बेटावर नित्यानंद याचा नवीन देश कैलासा आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत उपस्थित असलेल्या विजयप्रिया नित्यानंद यांचा उल्लेख कैलासाची राजदूत असे करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या वेबसाइटवर या महिलेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.  त्यात  विजयप्रिया या, कैलासा (Kailash) हा हिंदूंसाठी पहिला सार्वभौम देश आहे, ज्याची स्थापना नित्यानंद परमशिवम यांनी केली आहे. ते हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माच्या 10000 देशी परंपरांचे पुनरुज्जीवन करत आहेत. त्यात आदिशैव आदिवासी कृषी जमातींचाही समावेश असल्याचे सांगत आहेत.   

नित्यानंद यांचा जन्म अरुणाचलममध्ये झाला. त्याची जन्मतारीख अनेक ठिकाणी वेगळी आहे. वयाच्या तिस-या वर्षी योगीराज योगानंद पुरी यांनी त्याची पहिली दखल घेतली. त्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षी पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याचा दावा नित्यानंद यानी केली.  2002 मध्ये नित्यानंद या नावाने त्याने धार्मिक व्याख्याने द्यायला सुरुवात केली. हे नाव त्यांना महावतार बाबाजींनी हिमालयातील त्यांच्या मठातील भटकंतीच्या दिवसांत दिल्याचे सांगितले. नित्यानंद याने कर्नाटकातील बंगलोरजवळील बिदाडी येथे ध्यानपीठम आश्रम सुरू केला.  2013 च्या कुंभमेळ्यात त्याला महामंडलेश्वर म्हणून सन्मानित करण्यात आले. या दरम्यान नित्यानंदच्या शिष्यांची संख्या हजारोंनी वाढली. भारताबाहेरही त्याची लोकप्रियता वाढत होती. ब्रह्मसूत्रे, पतंजलीची योगसूत्रे, शिवसूत्रे आणि भगवद्गीता यांसारख्या विविध धर्मग्रंथांवर त्याची प्रवचने ऐकण्यासाठी हजारो भक्त येत असत. त्यांनी 400 हून अधिक सिद्धी, किंवा अलौकिक क्षमता शोधल्याचा दावा केला.  2010 मध्ये, सन टीव्हीने त्याच्यासंदर्भात वादग्रस्त व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रसारित केले.  ज्यात नित्यानंद आणि त्याची अनुयायी अभिनेत्री रंजिता, बेडरूममध्ये दाखवल्याचा दावा केला होता.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर  नित्यानंद आणि रंजिता यांनी व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला.  शिवाय  सन टीव्हीवर खंडणीचा आरोप केला.  हे प्रकरण कोर्टात गेले आणि देशभर याची चर्चा झाली.  2010 मध्ये नित्यानंदच्या एक परदेशी शिष्यानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावला.  यासंदर्भात तिने कर्नाटक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरु झाला.  नित्यानंद याला कोर्टात हजर रहाण्याचे आदेश मिळाले. 

=======

हे देखील वाचा : कागद नव्हे तर ‘या’ गोष्टीपासून तयार केल्या जातात भारतीय नोटा

=======

काही वर्षांनी, म्हणजे, 2019 मध्ये, तामिळनाडूतील एका जोडप्याने गुजरातच्या उच्च न्यायालयात दावा केला की त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुलांना नित्यानंदच्या आश्रमात नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकरणाचा तपास सुरु झाल्यावर नित्यानंद भारतातून फरार झाला. त्यानंतर हा नित्यानंद हिंदु राष्ट्र स्थापित केल्याच्या घोषणेसह प्रकट झाला. नित्यानंद यांनी घोषित केले की त्यांनी कैलासा नावाचे नवीन हिंदू राष्ट्र निर्माण केले आहे आणि पासपोर्ट, चलन आणि इतर कागदपत्रे जारी केल्याचा दावा केला.  त्याच्या घोषणेनूसार,  कैलासा हे जगभरातील विस्थापित हिंदूंनी निर्माण केलेले, सीमा नसलेले राष्ट्र आहे. कैलासा (Kailash) हे जगातील एकमेव सार्वभौम हिंदू राष्ट्र असल्याचा दावा त्यांनी केला.   ऑगस्ट 2020 मध्ये, नित्यानंद यांनी रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाची सुरुवात केली आणि त्याचे अधिकृत सोन्याचे चलन, कैलाशियन डॉलर जारी केले.   कैलासाने (Kailash) पर्यटकांसाठी तीन दिवसांचा व्हिसा जारी करणे सुरू केले. मात्र व्हिसाधारकांना ऑस्ट्रेलियातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या खाजगी चार्टर्ड-फ्लाइट सेवेवर, गरुडाने प्रवास करावा लागेल आणि सर्व अभ्यागतांना त्यांच्या वास्तव्या दरम्यान भोजन आणि निवासाची व्यवस्था केली जाईल, असेही जाहीर करण्यात आली.  कोविड काळात त्यांनी काही महिने श्रीलंकेतही आश्रय मागितल्याची माहिती आहे.  हा नित्यानंद भारतात अनेक प्रकरणांमध्ये हवा आहे. त्याच्यावर बलात्कार, अपहरण-बलात्कार, शोषण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. 2019 मध्ये तो देश सोडून पळून गेला होता. त्यानंतर 2020 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. आता अचानक संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत कैलासाचे (Kailash) प्रतिनिधी दिसल्यावर या देशाची चर्चा सुरु झाली.  त्यासोबत नित्यानंद यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली.  मात्र स्वतः एक देश विकत घेतल्याचा दावा करणारे नित्यानंद इंटरपोलच्या नोटीसला उत्तर देतील का, हाच खरा प्रश्न आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....