Home लाईफ स्टाईल परिक्षेपूर्वी टेंन्शन आलयं…’या’ पद्धतीने करा तणाव दूर
लाईफ स्टाईल

परिक्षेपूर्वी टेंन्शन आलयं…’या’ पद्धतीने करा तणाव दूर

10
Exam Anxiety
Exam Anxiety

परिक्षेच्या चिंतेमुळे आपल्या दैनंदिन कामावरही प्रभाव पडतो. यामुळे अभ्यासात काही वेळेस मन लागत नाही. आपण आधीपासूनच टेंन्शन मध्ये असलो तरी परिक्षेच्या दिवशी पेपर लिहिताना सुद्धा तसेच वाटते. अभ्यास झाला असेल तरीही तणावामुळे तुम्हाला तसे सारखे वाटत राहते आणि पेपर तुम्ही व्यवस्थितीत लिहिण्यावर लक्ष केंद्रित करु शकत नाहीत. अशातच परिक्षेपूर्वी टेंन्शन आलंय तर पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा. (Exam Anxiety)

-तुमच्यातील नकारात्मक विचार दूर करा
जर तु्म्हाला वाटत असेल की, तुम्हाला प्रतिकुल विचार येत असतील तर ते दूर करण्याचा विचार करा. तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी तुमच्या हातातील काम थोडावेळ बाजूला ठेऊन घराबाहेर पडा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मित्रांशी थोडावेळ बातचीत करा. यामुळे तुमच्यातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होईल.

-प्लॅन तयार करा आणि त्यानुसार कामे करा
परिक्षेपूर्वी तुम्ही तुमच्या अभ्यासाठी एक प्लॅन तयार करा. परिक्षेच्या अभ्यासासाठी अखरे मिनिटापर्यंत प्रतीक्षा करु नये. पालकांनीही मुलांच्या या प्लॅनकडे लक्ष द्यावे. तसेच ती त्यानुसार आपला अभ्यास आणि कामे करत आहेत का हे सुद्धा पाहावे.
विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला अभ्यास वेळेवर होतोय ना हे पहा आणि त्याचा सराव करत रहा.

-आरोग्याकडे लक्ष द्या
हे खरं आहे की, परिक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी कधी कधी आपल्या शारिरीक गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हेल्दी खाणं आणि झोपण्याची वेळ ठरवा. योगा करा. जेणेकरुन तुम्हाला आराम मिळेल. तसेच परिक्षेची पूर्ण तयारी केल्यानंतर थोडावेळ आराम करा.

-थोडावेळ अभ्यास करा
खुप वेळ अभ्यास करण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने अभ्यासाला बसा. जेणेकरुन एकदाच अभ्यासाचा ताण येणार नाही. प्रत्येक दिवशी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे याची तयारी आधीच करुन ठेवा. (Exam Anxiety)

-दिवसातून एकदा तरी प्राणायाम करा
परिक्षेपूर्वी खुप टेंन्शन असते. अभ्यास झाला असेल तरीही आणि नाही झाला तरीही! अशातच गोंधळाची स्थिती आणि ताण येऊ नये म्हणून दिवसातून एकदा तरी प्राणायाम करा. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि तुमचा अभ्यास करण्याचा मूड ही फ्रेश राहिल.

हे देखील वाचा- तुमचे मुल कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करत नाही… पालकांनी वापरा ‘या’ टीप्स

-परिवराची अथवा शिक्षकांची मदत घ्या
परिेक्षेचे अधिक टेंन्शन घेण्याऐवजी त्यावर तोडगा काढा. तुम्हाला ते जमत नसेल तर पालकांशी बोला. त्यांना तुमच्या समस्या सांगा. तसेच अभ्यासासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्या शिक्षकांना त्याबद्दल विचारा. जेणेकरुन तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर तुम्हाला ही समाधान वाटेल आणि टेंन्शनही येणार नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....