Home गाजावाजा स्पेशल अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा
गाजावाजा स्पेशल

अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा

9

शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा दोन महिन्यांपूर्वी भारताच्या अंबाला एअरबेसवर दाखल झाला. वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली.

भारतीय वायुदलाला या लढाऊ विमानांमुळे प्रचंड मोठी शक्ती मिळणार आहे. पाच राफेल विमानांनी 27 जुलैला फ्रान्समधून उड्डाण केले होते. फ्रान्स ते भारत या जवळपास 7 हजार किमी प्रवासात त्यांना संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अल डाफरा एअरबेसवर थांबा देण्यात आला होता. त्यानंतर 29 जुलैला त्यांचे भारताच्या अंबाला एअरबेसवर आगमन झाले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....