Home मनोरंजन ९० च्या दशकातील ‘ह्या’ होत्या बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप
मनोरंजन

९० च्या दशकातील ‘ह्या’ होत्या बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप

7
90s Controversial Bollywood Relationship
90s Controversial Bollywood Relationship

बॉलिवूडमधील रिलेशनशिपच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. मात्र जर एखाद्या बॉलिवूड कलकारांमधील नात्यात वाद झाला तर त्याची अधिकच चर्चा वेगवेगळ्या अँगलने केली जाते. परंतु बॉलिवूड मधील ९० च्या दशकातील असे काही रिलेशनशिप होते जे तुटल्यानंतर ही लोकांनी त्यावर बोलणे थांबवले नाही.तर पाहूयात कोणते होते बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप्स. (90s Controversial Bollywood Relationship)

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित
संजय दत्त आणि माधुरी या दोघांना चाहत्यांना ऑन-स्क्रिन आणि ऑफ-स्क्रिन एकत्रित पाहणे आवडायचे. संजय दत्त याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिच्या मृत्यूनंतर संजय-माधुरी हे जवळ आले होते. परंतु स्थिती अशी होती की, निर्मात्यांनी माधुरीला नो-प्रेग्नेंसी क्लॉजवर स्वाक्षरी करण्यात सांगितले होते. कारण प्रत्येकजण तिच्या लग्नाची आवर्जून वाट पाहत होते. पण १९९३ मध्ये संजयला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर माधुरीने संजय पासूनचा आपला मार्ग बदलला. अशातच त्यांच्या नात्याचा ही अंत झाला.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन
बॉलिवूड मधील खिलाडी अक्षयकुमार आज एक परफेक्ट फॅमिली मॅनच्या रुपात पाहिल जाते. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्याला बॉलिलूड मधील कॅसानोवा रुपात पाहिले जायचे. ९० च्या दशकात अक्षयचे काही जणांसोबत रिलेशनशिप होते असे बोलले जायचे. त्यापैकीच एक रवीना टंडन होती. ते एका रिलेशनशिपमध्ये होते, मात्र खिलाडी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे वेगळे झाले. त्यावेळी रवीनाने अक्षयला फसवल्याचा आरोप लावला गेला होता. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या होत्या. (90s Controversial Bollywood Relationship)

सलमान खान आणि ऐश्वर्या राय
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या मधील नाते ही बी-टाउन मधील सर्वाधिक चर्चेत राहिले होते. ऐश्वर्या जेव्हा संजय लीला भंसाली यांचा सिनेमा हम दिल दे चुके सनम मध्ये दिसली होती तेव्हा तो प्रेक्षकांना फार आवडला होता. तर शूटींग दरम्यान, त्या दोघांना एकमेकांवर प्रेम जडले. मात्र सलमानच्या वागण्यामुळे त्यांचे नाते तुटले. ऐवढेच नव्हे तर ऐश्वर्याने सलमानवर हिंसेचा आरोप ही लावला होता. दुसऱ्या बाजूला सलमान खान सोबत ब्रेकअप केल्यानंतर त्याने ऐश्वर्याचे करियर खराब करण्याचा प्रयत्न केला होता.

हे देखील वाचा- मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर

बॉबी देओल आणि नीलम कोठारी
एक काळ असा होता जेव्हा बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांचे रिलेशनशिप होते. दोघ एकमेकांसोबत लग्न ही करणार होते. मात्र तसे झाले नाही. खरंतर धर्मेंद्र त्या दोघांच्या नात्याविरोधात होते. कारण त्यांना एका अभिनेत्रीला आपली सून म्हणून करुन घ्यायचे नव्हते. अशातच त्यांचे नाते संपुष्टात आले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...