Home गाजावाजा स्पेशल भगवान विष्णुला अत्यंत प्रिय आहे देवउठनी एकादशी, चुकून सुद्धा करु नका ‘ही’ कामे
गाजावाजा स्पेशल

भगवान विष्णुला अत्यंत प्रिय आहे देवउठनी एकादशी, चुकून सुद्धा करु नका ‘ही’ कामे

11
Dev Uthani Ekadashi
Dev Uthani Ekadashi

कार्तिक महिना हा भगवान विष्णुला समर्पित केला जातो. या महिन्यात भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. या महिन्यात सर्व मोठे सण आणि उत्साह येतात. कार्तिक महिन्यात येणारी एकादशीला मात्र विशेष महत्व असते. कार्तिक शुक्लची एकादशी ही देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi ) म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णू ४ महिन्याच्या योग निद्रेनेंतर जागे होतात आणि याच दिवसापासून सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांना सुद्धा सुरुवात होते.

कार्तिक महिन्याची सुरुवात कार्तिक पौर्णिमेने होते. या महिन्यात ब्रम्हमुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. कार्तिक महिन्यातील एकादशीला देव उत्थान एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी अशा सुद्धा नावाने ओळखले जाते. या दिवशीच्या एकादशी कोणत्या गोष्टी खासकरुन करु नयेत याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.

Dev Uthani Ekadashi
Dev Uthani Ekadashi

देव उठनी एकादशीचा शुभ मुहूर्त २०२२
देव उठनी एकादशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या दिवशीच्या एकादशीला सुरुवात ३ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होऊन ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत असणार आहे.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार देव उठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहासाठी शुभ मुहू्र्त शनिवार ५ नोव्हेंबरला असणार आहे. तुळशी विवाह द्वादशी तिथीच्या दिवशी केला जातो. द्वादशी तिथीचा आरंभ ५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून होणार असून समाप्ती ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ६ मिनिटापर्यंत असणार आहे. (Dev Uthani Ekadashi)

हे देखील वाचा- 369 फूट उंच शिव मूर्ती बनवण्याची कहाणी

देव उठनी एकादशीच्या दिवशी चुकून ही करु नका ही कामे
-हिंदू धर्मात एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित केली जाते. या दिवशी भात खाणे वर्जित मानले जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी चुकून ही भाताचे सेवन करु नये. त्यामुळे पुढील जन्मात आपण सरपडणाऱ्या किड्यांच्या रुपात जन्म घेतो.
-एकादशीच्या दिवशी कधीच मांस-दारुचे सेवन करु नका. यामुळे भगवान विष्णूसह देवीसुद्धा तुमच्यावर नाराज होऊ शकते.
-महिला आणि वृद्धांच्या सन्मानामुळे श्री हरि प्रसन्न होतात. त्यामुळे प्रयत्न करा की, भगवानाला प्रसन्न करण्यासाठी महिला आणि वृद्धांचा आदर करावा.
-एकादशीच्या दिवशी स्वत:वर नियंत्रण ठेवा. चुकून ही कोणत्याही व्यक्तीवर राग व्यक्त करु नका. त्याचसोबत या दिवशी गरिबांना मदत करा.
-देव उठनी एकादशीच्या दिवशी ब्रम्हचार्य व्रताचे पालन करावे. जमीनीवर चटई टाकून झोपावे. तसेच मनात चुकीचे विचार ही आणू देऊ नका.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....