Home गाजावाजा स्पेशल दिवाळीच्यावेळी काहीवेळेस विक्री केला जातो बनावट मावा, अशा पद्धतीने तपासून पहा
गाजावाजा स्पेशल

दिवाळीच्यावेळी काहीवेळेस विक्री केला जातो बनावट मावा, अशा पद्धतीने तपासून पहा

10
Fake Mawa
Fake Mawa

धनतेरस आणि दिवाळी नव्हे तर भाऊबीजच्या दिवशी सुद्धा खुप मिठाईची मागणी असते. अशातच सध्या काही काळापासून बाजारात बनावट वस्तूंच्या विक्री केल्या जात आहेत त्यामध्ये भेसळयुक्त पदार्थांचा सुद्धा समावेश आहे. याच दरम्यान आता दिवाळी सुरु होणार असल्याने बाजारात बनावट मावा खुप विक्री केला जातो. मात्र असा मावा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही आताच नव्हे तर कधीही बाजारातून मावा करेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. त्यामुळे आम्ही तुम्हाला बनावट मावा कसा ओळखायचा हे सोप्प्या पद्धतीने सांगणार आहोत. (Fake Mawa)

माव्यात काय-काय भेसळ केली जाते
अधिक मावा बनवण्यासाठी दूधात कागद, वनस्पती तूप मिसळले जाते. तर काही ठिकाणी मैदा, बटाटा किंवा शिंगाड्याचे पीठ वापरले जाते. सर्वाधिक निष्कृष्ट आणि जीवघेणा मावा हा डिटर्जेंट, युरिया आणि सिंथेटिक दूधापासून बनवला जातो.

Fake Mawa
Fake Mawa

बनावट मावा कशा पद्धतीने ओळखावा?
-माव्यावर गरम पाणी टाका आणि त्यानंतर काही थेंब मीठाचे टाका. आता मीठाचे थेंब टाकल्यानंतरचा मावा निळ्या रंगाचा झाल्यास तर समजून जा त्यामध्ये स्टार्च मिसळला आहे. जर रंग बदलला नाही तर तो भेसळयुक्त नाही. जर तुम्ही दुकानातून मावा खरेदी करत असाल तर तेव्हाच तो तपासून पाहण्यासाठी थोडासा हातात घ्या आणि दोन्ही हातांच्या मध्ये तो रगडा. असे केल्यानंतर त्यामधून तेल आणि दाणेदार असेल. त्याचसोबत त्यामधून केमिकलचा वास ही येणार नाही.
-बनावट नसलेला मावा हा ओळखण्यासाठी आणखी एक पद्धत आहे. जेव्हा तुम्ही मावा घेतल्यानंतर त्याचे लहान गोळे तयार करा. ते तयार करताना त्यामध्ये भेगा पडल्या तर समजून जा तो खराब आहे.
-भेसळयुक्त मावा हा तोंडाला चिकटत नाही आणि बनावट मावा हा तोंडामध्ये अडकला जातो. (Fake Mawa)

हे देखील वाचा- दुबईत भारतापेक्षा स्वस्त का असते सोनं? जाणून घ्या अधिक

बनावट माव्याचे नुकसान
दिवाळीच्यावेळी बनावट मावा खाल्ल्याने फूड इंफेक्शन, पोटदुखी, लिव्हर आणि किडनीला इंफेक्शन होऊ शकते.

घरच्या घरी कसा तयार कराल मावा?
एक कप दूध घ्या आणि त्यात तीन कप मिल्क पावडर टाका. आता पॅनमध्ये दूध गरम होऊ द्या आणि त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाका. आता तीन मोठे चमचे तूप मिसळा आणि हवं असल्यास वेलची पावडर सुद्धा टाका. १० मिनिटे हे मिश्रण गरम होऊ द्या. असे केल्याने तुमचा मावा तयार होईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....