Home गाजावाजा स्पेशल आंतराळात कचरा पसरवणाऱ्या अमेरिका-चीनसह ‘हा’ देश सुद्धा सर्वाधिक पुढे
गाजावाजा स्पेशल

आंतराळात कचरा पसरवणाऱ्या अमेरिका-चीनसह ‘हा’ देश सुद्धा सर्वाधिक पुढे

10
Space junk
Space junk

धरतीवरच नव्हे तर आंतराळात सुद्धा कचरा अधिकाधिक वाढत चालला आहे. याला स्पेस जंक (Space Junk) किंवा स्पेस डेब्रिसच्या नावाने ओळखले जाते. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास खराब झालेल्या सॅटेलाइट्स आंतराळात एका गुच्छाप्रमाणे फिरताना दिसून येतात. या स्पेस डेब्रिसमध्ये स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट, रॉकेट, बॅटरी आणि अन्य टेक्नॉलॉजीचे जुने तुकडे आणि खराब तुकडे असतात. जे माणसांनीच पसरवलेले आहेत आणि ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतात. मात्र जेव्हा एखादे स्पेस मिशन पूर्ण होते तेव्हा एजेंसी सॅटेलाइट आपल्या स्पेसक्राफ्टला तसेच सोडत असल्याने कचरा वाढला जातो. आकडेवारीवरुन समजून घेऊयात कोणता देश सर्वाधिक कचरा आंतराळात करतो त्याबद्दल अधिक.

खासकरुन स्पेस मिशन संदर्भात अमेरिकेचे नाव सर्वात प्रथम आपल्या समोर येते. मात्र आकडेवारी सांगते की, आंतराळात वाढणारा कचरा हा सर्वाधिक रशियाकडून करण्यात येत आहे. नासाच्या रिपोर्टवरुन कळते की, आंतराळात कचऱ्याचे २७ हजार तुकडे २५,२६६ किमी प्रति तासाने तरंगत आहेत. तर २७ हजारांपैकी २३ हजार कचऱ्याच्या तुकड्यांचा आकार एका चेंडूपेक्षा ही मोठा आहे. तर भारतीय स्पेस मिशनच्या कारणास्तव आंतराळात ११४ कचऱ्याचे तुकडे पसरले गेले आहेत. या कचऱ्यामुळे नेहमीच एखाद्या उपग्रहाला किंवा आंतराळ यानाला टक्कर देण्याची शक्यता निर्माण होते.

Space junk
Space junk

नासाच्या अधिकाऱ्यांनी अपडेट देत असे ही म्हटले होते की, हा कचरा २-३ वर्षानंतर पृथ्वीवर पडू शकतो. मात्र यावक नासाच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते की, घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण ते पडण्याच्यावेळी त्याच्या वायुमंडळात येण्यापूर्वीच जळून खाक होतील. (Space Junk)

दरम्यान, पृथ्वीवर कचरा अधिक होऊ नये म्हणून काही नियम तयार करण्यात आले आहेत. मात्र आंतराळासाठी असे कोणतेही नियम नाहीत. नासाच्या नुसार, यासाठी काही नियम आणि कायदे नाही ना काही असे आहे की, करोडोंच्या संख्येने कचरा पृथ्वीच्या कक्षेतून साफ केला जाईल. NHM नुसार, युनाइटिड नेशनकडून अनुरोध करण्यात आले आहे की, जे सेटेलाइट स्पेसमध्ये लॉन्च केले जातात त्यांना मिशन संपण्यासह २५ वर्षाच्या आतमध्ये पृथ्वीच्या कक्षेतून हटवले जातील. मात्र असे करणे खुप कठीण सुद्धा आहे.

हे देखील वाचा- १३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर

आंतराळात कोणत्या कामासाठी किती आहेत सॅटेलाइट्स?
-कम्युनिकेशन- ७७७
-अर्थ ऑब्जर्वेशन- ७१०
-टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट- २२३
-नेविगेशन-पोजिशनिंग- १३७
-स्पेस साइंस/ऑब्जर्वेशन- ८५
-अर्थ साइंस- २५

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....