Home गाजावाजा स्पेशल जगात तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती असू शकते? पहा काय म्हणतात तज्ञ
गाजावाजा स्पेशल

जगात तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती असू शकते? पहा काय म्हणतात तज्ञ

7
Twins Person
Twins Person

आपण सिनेमात पाहतो की, एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्ती असतात. सीता-गीता सिनेमा मध्ये सुद्धा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यासारखी आणखी एक व्यक्ती दाखवली गेली होती. अशा कथेवर आधारित काही सिनेमे सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. मात्र खरंच जगात आपल्या चेहऱ्यासारखी दिसणारी आणखी एखादी व्यक्ती असते का? बहुतांश वेळा असे ही म्हटले जाते की, या जगात आपल्या सारखी दिसणाऱ्या व्यक्ती कुठे ना कुठे तरी असतातच. काही वेळेस आपणच आपल्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती पाहतो. परंतु चेहरा हा कधीच एकसारखा नसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये अभिनेता अनिल कपुर याच्या चेहऱ्यासारखा दिसणारा व्यक्ती तो होता. (Twins Person)

खरंतर तो अमेरिकेतील एक बॉडी बिल्डर होता. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तोच फोटो खुप व्हायरल झाला होता. काही लोकांनी अनिल कपुर याने ऐवढी तगडी बॉडी कशी बनवली असे सुद्धा विचारु लागले होते. मात्र आपल्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असतात का याबद्दल तज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊयात.

Twins Person
Twins Person

आपल्या सारखा दिसणारा व्यक्ती असणे म्हणजे निव्वळ योगायोग
पीडियाट्रिशियन डॉ. अरुण शाह सांगतात आजकाल सोशल मीडियाचा खुप वापर केला जात आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसारखा दिसत असेल तर तो लगेच व्हायरल होतो. असे नव्हे की, यापूर्वी कधी एकसारख्या चेहरेपट्टीची माणसं नव्हती. मात्र आता ही गोष्ट अधिक समोर येत आहे. परंतु असे कधीच होऊ शकत नाही की, एकसारखी दिसणारी व्यक्ती असते. हा निव्वळ योगायोगच असतो. हे फक्त जुळ्या मुलांसंदर्भात लागू होते. जर मुलांची आई ही वेगवेगळी असेल तर त्याच चेहरेपट्टीचा व्यक्ती कसा असू शकतो.

तर काही वेळेस असे होते की, एका जुळ्य मुलांचे वडिल हे वेगवेगळे असू शकतात. याला इहेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशन असे म्हटले जाते. मात्र जगातील कोणत्या ठिकाणी जी लोक आहे त्यांच्यासारखी लोक नसतात. फोटो मध्ये दोन व्यक्तीचे चेहरे समान दिसत असतील. पण बारकाव्याने पाहिल्यास काही तरी त्यांच्यामध्ये वेगळेपण असल्याचे दिसून येते. त्याचसोबत त्यांच्या डोळ्यांचा रेटिना किंवा हाताचे फिंगर प्रिंट सुद्धा एकसारखे नसतात. आपल्या सारखा दिसणारा व्यक्ती असणे हा एक योगायगच म्हणावा लागेल. यामागे कोणतेही विज्ञान नाही. (Twins Person)

हे देखील वाचा- आपल्या मृत्यूसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करतात ‘या’ देशातील लोक

डीएनएच्या माध्यमातून कसे केले ओळखले जाते
डॉ. शाह असे सांगतात की, मुलाला काय आजार असू शकतो किंवा त्याचे वडिल कोण आहेत हे कळून घेण्यासाठी डीऑक्सीराइबो न्युक्लिक एसिड टेस्ट (डीएनए) केली जाते. या चाचणीत मुलाची संपूर्ण माहिती मिळते. जर दोन व्यक्तीचे चेहरे समान असतील आणि त्यांची डीएनए चाचणी केल्यास स्पष्ट होते की, याचे जीन्स वेगळे आहेत. कधीच असे होऊ शकत नाही की, जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती ही तुमच्यासारखी दिसणारी असेल.

मात्र सध्या सोशल मीडियात स्वत: प्रसिद्ध करण्यासाठी लोक सर्जरी किंवा क़ॉस्मेटिकचा वापर करतात. जेणेकरुन एखाद्या पर्सनॅलिटी सारखे आपण ही दिसू शकतो. मात्र असे कधीच होत नाही की, तुमच्यासारखा दिसणारा दुसरा व्यक्ती असतो. त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही ना काही तरी अंतर असते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....