Home गाजावाजा स्पेशल १३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर
गाजावाजा स्पेशल

१३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर

12
Ancient Things
Ancient Things

गेल्या काही काळापासून इज्राइल मध्ये जुन्या वस्तूंचा शोध घेतला जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी प्राचीन काळातील एक टॉयलेट सीट मिळाली होती आणि त्याचसोबत पुरातत्व संशोधकांनी १५०० वर्षांपूर्वी बनवलेली एका दारुच्या फॅक्ट्री सुद्धा शोधून काढली. त्यावर रिसर्च सुरु आहे. दुसऱ्या बाजूला एका समुद्रात १३०० वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष मिळाले आहेत. ऐवढेच नव्हे तर यासोबत काही मौल्यवान सामान ही मिळाले आहे.(Ancient Things)

सातव्या शतकाच्या आसपास बुडाले होते जहाज
खरंतर ही घटना इज्राइलमधील एका समुद्रकिनाऱ्यावरील आहे. द मिररने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सातव्या शतकाच्या आसपास हे जहाज समुद्रात बुडाले होते आणि त्यावेळी कोणीही जीवंत वाचले नव्हते. हैराण करणारी गोष्ट अशी की, जवळजवळ १३०० वर्षानंतर हे जहानंतर हे जहाज मिळाले आहे. त्याचसोबत त्यामध्ये मिळालेले सामान ही अत्यंत सुरक्षित आहे.संशोधकांच्या मते हे व्यापारी जहाज २५ मीटर लांब होते. तर डेबोरा सिविकेल यांच्या मते जहाज व्यापारासाठी आलेल्या लोकांचे खासगी सामान सुद्धा होते. जसे की, लाकडाचा कंगवा सुद्धा मिळाला आहे.

Ancient Things
Ancient Things

जवळजवळ २०० मटक्यांमध्ये मौल्यवान वस्तू मिळाल्या
रिपोर्ट्सनुसार, जहाजात जवळजवळ २०० मटक्यांमध्ये बहुमूल्य वस्तू होत्या. जहाज मेडिटेरियनच्या वेळी सामाने भरलेले होते. दरम्यान, जहाज कोणत्या कारणामुळे बुडाले याबद्दल समोर आलेले नाही. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, सातव्या शतकात इस्लामिक साम्राज्याच्या स्थापनेनंतर पश्चिम देशांतून लोक व्यापारासाठी येथे यायचे. म्हणजेच धार्मिक विभागानंतरच या मेडिटेरियन परिसरात व्यापार व्हायचा.

दरम्यान, जहाजाच्या आसपास मिळालेल्या कलाकृती पाहून असे वाटते की, जहान मिस्र किंवा तुर्की येथून आले होते. या शोधात संशोधकांना २०० अशी मटकी मिळाली आहेत ज्यामध्ये मेडिटेरियनच्या परिसरासंबंधत खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत. जहाजातील मटक्यांमध्ये माशाचे सॉस, विविध प्रकारचे तैल, खजूर आणि अंजीरचा समावेश होता. खरंतर हे जहाज अक्रोडच्या झाडाच्या लाकडापासून तयार करण्यात आले होते. सध्या या सर्व संबंधित विभागाकडे सोपवण्यात आल्या आहेत. त्याचा तपास आणि शोध मोठ्या प्रमाणात केला जात आहे. (Ancient Things)

हे देखील वाचा- उत्तराखंडातील ‘या’ मंदिरात आहे चुंबकीय शक्ती, शरिराला आकर्षून घेतात असे म्हटले जाते

पूर्वजांचे एक लग्जरी टॉयलेट ही मिळाले होते
यापूर्वी सुद्धा इज्राइलच्या संशोधकांनी यरुशलमध्ये एका अशा दगडाचा शोध लावला होता जो २७०० वर्षांपूर्वीचा होता. ऐवढेच नव्हे तर त्याचा वापर पूर्वजांनी टॉयलेटच्या रुपात केला होता. असे सांगितले जाते की, ते पूर्वजांचे एक लग्जरी टॉयलेट होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....