Home व्यक्ती विशेष वयाच्या अवघ्या १० व्या वर्षात गायन करणाऱ्या भूपेन हजारिका यांच्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल
व्यक्ती विशेष

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षात गायन करणाऱ्या भूपेन हजारिका यांच्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल

9
Bhupen Hazarika
Bhupen Hazarika

गुगलकडून आज प्रसिद्ध गायक आणि म्युझिशियनसह सिनेमा निर्माते भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांच्या ९६ व्या जयंती निमित्त एक खास गुगल डुडल त्यांना समर्पित केले आहे. गुगलने आपल्या सर्चच्या होम पेजवरच त्यांना सन्मानित करत एक सुंदर पेटिंग तयार केली आह, वर्ष २०१९ मध्ये भूपेन हजारिका यांना माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारत रत्न प्रदान करण्यात आला होता.

प्रसिद्ध गायक, एक कवि आणि सिनेमा निर्माते म्हणून भूपेन हजारिया यांची ओळख होती. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला होता. तर २०११ मध्ये ५ नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. हजारिका पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात फार लोकप्रिय होते. आसाम आणि पूर्वोत्तरची संस्कृती आणि लोक संगीत लोकांमध्ये आणण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली होती.

Bhupen Hazarika
Bhupen Hazarika

भूपेन हजारिका यांना राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, दादा साहेब फाळके पुरस्कार, पद्म विभूषण आणि अन्य काही प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना आपल्या आवाजाच्या माध्यमातून रोमांन्स ते सामाजिक, राजकिय विषयांसाठी संगीत बनवण्यासाठी ओळखले जायेचे. आसामी संगीतातील त्यांचे काही मास्टरपीस आजही प्रेक्षकांना खुप आवडतात. त्यामध्ये बिस्तरनो परोरे, मोई एति जजाबो, गंगा मोर मां आणि बिमुर्तो मुर निक्सती जेन यांचा समावेश आहे. (Bhupen Hazarika)

तर भूपेन हजारिका यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची प्रेम कथा ही फिल्मी स्टाइल आहे. त्यांची आत्मकथा ‘भूपेन हजारिका: एस आय न्यू हिम’ प्रदर्शित झाल्यानंतर जगाला कळले होते की, कल्पना आणि भूपेन हजारिका ४० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. खरंतर कल्पना लाजमी या बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. जेव्हा पहिल्यांदा भूपेन हे कल्पना यांना भेटले होते तेव्हा कल्पना यांचे वय १७ वर्षाचे होते आणि भूपेन त्यावेळी ४५ वर्षांचे होते. दोघांमध्ये २८ वर्षांचे अंतर होते. तरीही या दोघांनी एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याचे ठरविले होते.

हे देखील वाचा- मुलीच्या लग्नात आग्रह करूनही आचार्य अत्रे जेवायला बसले नाहीत कारण … 

आजच्या त्यांच्या जयंती निमित्त देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, मी उत्तम आवाजाचे धनी भारत रत्न डॉ. भूपेन हजारिका यांना त्यांच्या जयंती निमित्त नमन करतो. तुम्ही बहुमुखी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गीतांमधून भारतीय संगीत आणि असाम मधील लोक संस्कृती जगभरात लोकप्रिय केली. संगीत आणि कलेच्या जगात त्यांचे योगदान हे फार मोठे आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...