Home व्यक्ती विशेष प्रदीप पटवर्धन – त्यांचं गिरगावातलं अस्तित्व कुठलाच गिरगावकर, कधी विसरू शकणार नाही.
व्यक्ती विशेष

प्रदीप पटवर्धन – त्यांचं गिरगावातलं अस्तित्व कुठलाच गिरगावकर, कधी विसरू शकणार नाही.

9
Pradeep Patwardhan
Pradeep Patwardhan

मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज सकाळी दु:खद निधन झालं. गिरगाव इथल्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. महाविद्यालयीन दिवसांपासूनच त्यांना अभिनयात रुचि होती, नाटक सिनेमाची आवड होती आणि त्या दरम्यानच त्यांनी अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात एकांकिका करण्यापासून केली. नाटक क्षेत्र गाजवलं शिवाय अनेक मराठी चित्रपटांत कामं केली.(Veteran actor Pradeep Patwardhan passes away)

प्रदीप पटवर्धन यांची ‘मोरूची मावशी’ या नाटकातली भूमिका प्रचंड गाजली होती. शिवाय नवरा माझा नवसाचा या सिनेमात त्यांनी साकारलेला ‘बाबू कालिया’ सुद्धा लोकांच्या लक्षात राहिला. अतिशय सहज अभिनय करणं ही त्यांची खासियत होती.प्रदीप पटवर्धन यांनी अनेक नाटकांसह, चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. तगडं टायमिंग असणारे विनोदी अभिनेते अशी त्यांची ओळख होती. 

‘नवरा माझा भवरा’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘गोळा बेरीज’, ‘लावू का लाथ’, ‘एक फुल्ल चार हाफ’, ‘डान्स पार्टी’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘भुताळलेला’, ‘डोम’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’, ‘परीस’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केली. तसेच ‘होल्डिंग बॅक’, ‘मेनका उर्वशी’, ‘थँक यू विठ्ठला’, ‘एक दोन तीन चार’  आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती सुद्धा केली होती.

त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं पण त्यांचं सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक म्हणजे ‘मोरूची मावशी’. या नाटकाचे तब्बल दीड हजारहून अधिक प्रयोग त्यांनी केले. शिवाय बायको असून शेजारी, लग्नाची बेडी, टूर टूर या नाटकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी सहजसुंदर अभिनय साकारला आहे. शिवाय कॉमेडीची बुलेट ट्रेन या रीयालिटि शोमध्ये सुद्धा त्यांचा अभिनय बघणं हे नेहमी मन प्रसन्न करणारं असायचं. (Memories of Pradeep Patwardhan)

माणसं मोठी होतात, त्यांच्यासोबत त्यांची स्वप्न सुद्धा मोठी होतात. काही वेळा घरापासून लांब सुद्धा निघून जातात. पण प्रदीप पटवर्धन यांच्यासारखी माणसं असतात जी आपलं मूळ कधीच विसरत नाहीत. प्रदीप पटवर्धन यांनी आपलं अख्खं आयुष्य गिरगावातल्या ‘झावबा वाडीत’ व्यथित केलं आणि अखेरचा श्वासही आपल्या मूळ घरातच घेतला. 

प्रदीप पटवर्धन यांचं गिरगावाशी अतिशय जवळचं नातं होतं. सेलेब्रिटी झाल्यानंतरही ते प्रत्येक सण गिरगावात येऊन साजरा करायचे. दही हंडीचा जल्लोष असो किंवा गणेशोत्सवातली गणपती बाप्पाची मिरवणूक असो, प्रदीप पटवर्धन यांचा प्रत्येक सोहोळयात हिरीरीने सहभाग असायचा. त्यांचा गिरगावातला वावर अत्यंत साधा असायचा. त्यांनी अनेक वर्ष बँकेतली नोकरी सांभाळत नाटक सिनेमांत काम केलं. आपल्या कामातला चोखपणा त्यांनी कधीच सोडलेला नव्हता. (Pradeep Patwardhan)

सेलेब्रिटी असूनही त्यांच्या साधेपणाची अजून एक गोष्ट म्हणजे ते अनेकदा सीएसटी ते गिरगाव बसने प्रवास करायचे. ते अतिशय सामान्य गिरगावकरासारखे वावरायचे खरे पण तरी त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उठून दिसणारं आणि छाप पाडणारं होतं. रस्त्यातून चालताना अनोळखी माणूससुद्धा त्यांच्याकडे एकदातरीवळून बघत असे. 

====

हे देखील वाचा – सुषमा स्वराज: वाजपेयी काळात घेतला होता महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे बहरली चित्रपटसृष्टी

====

गिरगावच्या गोविंदाची प्रदीप पटवर्धन यांच्याशी जोडलेली अजून एक आठवण (Memories of Pradeep Patwardhan)

मुंबईत गोविंदा म्हणजे दही हंडी या सणाची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाउकच आहे. पूर्वी सुद्धा ही क्रेझ तेवढीच होती. त्याकाळी गिरगावातल्या विविध वाड्यांचे गोविंदा निघायचे. त्यात प्रदीप पटवर्धन म्हणजे त्यांच्या वाडीच्या गोविंदाचं मुख्य आकर्षण होते. डोक्यावर गोल टोपी, घट्ट हाफ चड्डी घालून आणि डोळ्यावर गॉगल लावून प्रदीप पटवर्धन नेहमी गोविंदात, गोविंदा रे गोपाळा या गाण्यावर थिराकताना दिसायचे. ते नाचत असले की, गिरगावच्या चाळींच्या गॅलरीमध्ये आणि खिडकीत उभ्या राहून वाट बघत असलेल्या अनेक तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकायचे.(Pradeep Patwardhan)

एक सच्चे गिरगावकर असणारे, झावबा वाडीत आपल्या आईसोबत राहणारे, अभिनयात अतिशय प्रवीण असलेले प्रदीप पटवर्धन आज आपल्यात नाहीत. आज त्यांच्या आठवणीत ठाकुरद्वारचा नाका सुद्धा सुन्न आणि शांत झाला असेल, हे नक्की. प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.(Pradeep Patwardhan)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

abdul samad khan
व्यक्ती विशेष

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान कोण होते? मुघलांशी काय होते कनेक्शन? घ्या जाणून

Abd al-Samad Khan : अब्दुल समद खान हे १८व्या शतकातील मुघल साम्राज्यातील एक...

Thailand | Top Marathi Headlines
व्यक्ती विशेष

Thailand : थायलँडमध्ये थाय मसाज देण्यासाठी डॉ. शिवगो यांनी असा लावला शोध, वाचा रंजक गोष्ट

Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून...