Home गाजावाजा स्पेशल एका यशस्वी राजकारण्याची कर्तृत्ववान सावली – शोभाकाकी बाबर
गाजावाजा स्पेशल

एका यशस्वी राजकारण्याची कर्तृत्ववान सावली – शोभाकाकी बाबर

11
Mrs Shobha Babar
Mrs Shobha Babar

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याभाेवती नेहमीप्रमाणे आजही शेकडाेंचा गराडा हाेता. पण आजची गर्दी सांत्वनासाठी हाेती. बाबर यांच्या घरी जाणाऱ्या प्रत्येकाला आज काहीतरी चुकल्यासारखे वाटत हाेते. भाऊ देखिल स्वतः लाेकांच्या गर्दीत हाेते, पण काहीतर हरवल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेते. शाेभाकाकी गेल्यानंतरचा आज बाबर कुटूंबियांचा पहिलाच दिवस हाेता. त्या असतानाचा ‘भारलेपणा’ अन् त्या नसतानाचा ‘रितेपणा’ आज स्पष्ट जाणवत हाेता. (Mrs Shobha Babar)

सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा याही पुढे जाऊन मनाला स्पर्श करते ती आपुलकीची वीण… बाबर कुटूंबिय आणि तमाम मतदारसंघ यांच्यात एक जिव्हाळयाची वीण निर्माण करण्याचे काम शाेभा काकींनी केले हाेते. आज ही वीण निसटली हाेती. भाऊंच्या घरी जावे.. काही प्रश्न, समस्या, मनात असाव्यात आणि काकींचा ताे हसतमुख चेहरा समाेर यावा. त्याचवेळी आपले अर्धे काम हलके झाल्यासारखे वाटावे. एक निगर्वी, निष्पाप आणि साेज्वळ अशी काकींची मूर्ती समाेर यायची. 

काकींचा वावर असलेले भाऊंचे घर कधी राजकारण्याचे घर वाटलेच नाही. हा प्रवास काही आज कालचा नाही, तर भाऊंच्या राजकारणाच्या सुरवातीपासूनचा आहे. त्या काळात तर कुठले आले कामगार आणि कुठले काय, दाेन खाेल्यातला ताे संसार. काकींचा अख्खा दिवस स्वयंपाक घरात जायचा. शेकडाे कप चहा व्हायचा, वेगाने कितीही लाेकांचा चहा करण्याचे त्यांचे ते कसब अगदी अखेरपर्यंत त्यानी टिकवले हाेते. भाऊंची माणसं हीच आपली संपत्ती म्हणून त्या नेहमी राब राब राबल्या, कधी तक्रार केली नाही, ना कधी चेहऱ्यावर खंतही दाखवली नाही. अखंड आयुष्यात भाऊंनी कधी काकींना साधे कुठे फिरायला नेले नाही ना कधी साधा सिनेमा पहायलाही नेला नाही. सार्वजनिक जीवनात काम करत असताना माेठा त्याग करावा लागताे, काकी हे त्याचे मुर्तीमंत उदाहरण हाेते. 

भाऊंच्या पहिल्या निवडणूकीत तर रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी पिठलं भाकरी बनवून देण्यासाठी काकींची चुल नेहमीच पेटलेली असायची. जेव्हा एखादया कुटूंबाचा उत्कर्ष दिसताे तेव्हा त्यामागे काही व्रतस्थ आयुष्य कारणीभूत असतात. शाेभाकाकींचे 62 वर्षांचं अल्पायुषी जीवन एका लाेकप्रीय नेत्याच्या जडणघडणीमागील अदृश्य व्रतच म्हणावे लागेल. (Mrs Shobha Babar)

मागच्या महिन्यात भाऊ काकींना घेवून उज्जैनच्या महांकालेश्वरला गेले हाेते. कदाचित हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंददायी व संस्मरणीय प्रसंग असावा, तेच काय ते त्यांना आयुष्याचे सार्थक वाटले असावे आणि त्यांनी या जगाचा निराेप घेतला असावा. 

आज बाबर कुटूंबिय उत्कर्षाच्या परमाेच्च क्षणावर आहेत. पाेलिसांच्या ताफ्यात, बंदाेबस्तात दिमाखात घरी येण्याचे हे दिवस असताना…त्याच पाेलिसांच्या ताफ्यात काकींचं पार्थिव घरी येणे, ही मनाला सहन न हाेणारी गाेष्ट आहे. त्यामुळेच आज बाबर कुटूंबातील प्रत्येकाला एक अधुरेपण जाणवत आहे. पहाडासारखा निधडया छातीचा राजकारणी म्हणून ओळखले जाणारे भाऊ आज काकींच्या जाण्याने हळवे झाले आहेत. भाऊंंच्या समाेर जेवणाचे ताट, औषध गाेळया मिळायच्या. कदाचित काकींना मृत्यूची चाहूल लागली असावी, त्यांनी रूग्णालयात जाण्यापूर्वी भाऊंना व्यवस्थित महिन्याभराची औषधे हातात दिली हाेती. तुम्ही गाेरगरीब लाेकांचे बघा मी तुमचे आणि कुटूंबाचे सारे काही बघते. हे कर्तव्य, न बाेलता निमुटपणे तितक्याच आनंदाने पार पाडणाऱ्या काकींनी अखेरपर्यंत कर्तव्यात कसूर केली नाही, भाऊ आणि काकी यांचे आयुष्येच असे हाेते की,

‘तू चंद्र नभीचा हाेता

           मी किरण शलाका बनते

           तू प्रकाश ज्याेतीमधला

           मी वात हाेऊनी जळते’….!

काकी आयुष्यभर समईतल्या वातीसाख्या जगल्या. रात्रंदिवस प्रत्येकाला त्यांनी उजेड दिला. म्हणून बाबर नावाचा वटवृक्ष आज उभा आहे. खरंतर त्यांचं हे जाण्याचं वय न्हवतं, “मी पाठीशी आहे, तुम्ही  फक्त लढा”, अस म्हणणारे काेणीतरी असणं देखील आयुष्याला उर्मी देणारे असते. कितीही महापूर येतात, वादळे येतात पण त्यावर मात देवून उभी राहणारी माणसं त्यांचं श्रेष्ठत्व सिध्द करतात. शाेभाकाकी त्यापैकीच एक. त्यांचं शिक्षण त्या तुलनेत कमी झालं असेल पण आयुष्याच्या शाळेतील धडे गिरवताना त्या कधीच कुठे कमी पडल्या नाहीत. (Mrs Shobha Babar)

काही प्रसंग तर असे हाेते की, भाऊंसमोर जेव्हा आर्थिक संकटे यायची तेव्हा हसत हसत अंगावरील साेने काढून त्या भाऊंच्या हातात दयायच्या. आयुष्याचे मर्म त्यांना कळले हाेते. अंतिम समाधान कशात आहे हे त्या जाणून हाेत्या. म्हणून कधी सत्ता, संपत्तीचा साेस त्यांनी केला नाही. त्या कधी कुणावर रागवल्या नाहीत. संसाराचा गाडा हाकताना काकींनी जे जे म्हणून याेगदान दिले ते बाबर घराण्यासाठी अविस्मरणीय आहे.

===========

हे देखील वाचा – तरुण वयात संपादक ते शिवसेना प्रवक्ता, संजय राऊतांची आजपर्यंतची कारकीर्द पहा

===========

सुख सुविधा पायाशी लाेळण घेत असताना एखादे व्रतस्थ जीवन जगणे फार कठिण असते. काहीही जवळ नसताना त्याची कुठे तक्रार नाही आणि सर्व काही असताना त्याचा कधी बडेजावही नाही. अशी माणसं आदर्शवत जीवन जगून जातात. त्यागाचे जीवन जगताना अध्यात्म आणि धार्मिकता अंगी असावी लागते. काकी या निस्सिम भक्त हाेत्या. आजही त्यांच्या अंगणात शंकराचे मंदिर आहे. 

श्रावणासारख्या पवित्र महिन्यात त्या त्यांच्या देवाघरी गेल्या. त्यांचे जाण्याचे वय न्हवते पण विटयातून पुण्याकडे उपचारासाठी जाताना भरभरून जगल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर हाेते. त्या काहीही न बाेलता कसे जगायचे  त्याचे मर्म सांगून गेल्या, पण मागे प्रत्येकाच्या आयुष्यात एक अधुरेपण साेडून गेल्या. त्या गेल्या पण त्या असताना आणि त्या नसतानाचा फरक दाखवून गेल्या म्हणूनच आज अनिलभाऊंसारख्या एका जिद्यी व कणखर  माणसाकडे पाहताना नक्कीच दाेन ओळी आठवतात. (Mrs Shobha Babar)

             ‘ताे प्रचंड वड कसा

             उन्मळून पडला हाेता,

             म्हणे त्याला बिलगलेला

        सायलीचा वेल कुणी खुडला हाेता’….!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....