Home गाजावाजा स्पेशल पुरातत्ववाद्यांनी शोधून काढला ५०० वर्ष जुना बार
गाजावाजा स्पेशल

पुरातत्ववाद्यांनी शोधून काढला ५०० वर्ष जुना बार

5
5000 Year old bar
5000 Year old bar

दक्षिण इराक मध्ये पुरात्ववाद्यांना ५ हजार वर्ष जुना असलेला असा एक बार शोधण्यास यश मिळाले आहे. जो दिसण्यास अत्यंत अनोखा आहे. या बारचे जरी आता खडकात रुपांतर झाले असले तरीही एक फ्रीज आणि ओवन सुद्धा आहे. अमेरिका आणि इटली मधील पुरातत्ववाद्यांनी संयुक्त रुपात लागशच्या खडकाळ भागात हा शोधून काढला आहे. हे शहर नसीरियाहच्या उत्तर पूर्वेला आहे. प्राचीन काळात या शहराला सुमेरियन सभ्येतेचे सुरुवाती केंद्र मानले जात होते. आता त्याला अल हिबा असे नाव दिले गेले आहे. (5000 Year old bar)

दक्षिण इराक मध्ये लागशच्या खडकाळ भागात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना एक अंगण सापडले आहे. यामध्ये बसण्यासाठी बाक सुद्धा आहेच. पुरातत्ववाद्यांनी असा दावा केला आहे की, या अंगणाचा दारुचा बार म्हणून वापर केला जात असावा. याची संरचना ही अत्यंत आधुनिक आहे. कारण येथे ओवनचे भांडे आणि जेवण थंड करण्यासाठी शंकुकार वाडगं ही मिळाले, जे थंड करण्याचे काम करत असावे. खास गोष्ट अशी की, यामध्ये माशांचे अवशेष ही मिळाले आहेत. येथील खोदकामाचे निर्देशक पिटमॅन यांनी एफपी यांना असे सांगितले की, आम्हाला येथे रेफ्रिजरेटर सुद्धा मिळाला आणि जेवण देण्यासाठी शेकडो भांडी, येथे एक बाक सुद्धा आहे जेथे लोक बसत असावी. ओवन जो आहे तो केवळ जेवण शिजवण्यासाठी वापरला जात असावा.

पुरातत्ववाद्यांनी असा दावा केला आहे की, ही अशी एक जागा असावी जेथे लोक खाण्यासाठी येत असतील. येथे असे ही काही पुरावे मिळाले आहेत ज्यावरुन पुष्टी केली जाऊ शकते की, येथे बियर आणि दारु पिण्यासाठी लोक यायची. यामुळेच त्याला दारुचा बार मानले जात आहे. पुरातत्ववाद्यांच्या मते, या मधुशाला अशा कारणास्तव म्हटले जाते कारण सुमेरियासाठी बियर हे सर्वसामान्य पेय होते.

तसेच त्यांनी असे म्हटले आहे की, आजूबाजूला दारु बनवण्यासाठी काय केले जायचे हे सुद्धा मिळाले आहे. २०१९ मध्ये पेन संग्रहालय, कॅम्ब्रिज विव आणि बगदाद मध्ये स्टेट बोर्ड ऑफ एंटीक्विटी अॅन्ड हेरिटेज मध्ये झालेल्या कराराअंतर्गत हे खोदकाम केले जात आहे. यामध्ये ड्रोन फोटोग्राफी आणि आनुवंशिक विश्लेषणाची मदत ही घेतली जात आहे. जेणेकरुन सुमेरियल सभ्यतेबद्दल अधिक माहिती मिळू शकते. यावरुन असे कळू शकते की, या त्यावेळी लोक कशा प्रकारे रहायचे.(5000 Year old bar)

हे देखील वाचा- शापित झरा, जनावर पाण्यात गेल्यानंतर बनतात दगडं

पुरातत्ववाद्यांच्या मते येथे यापूर्वी ही काही वेळा खोदकाम करण्यात आलेले आहे. केवळ वास्तुकला आणि अभिजात वर्गाबद्दल समजून घेण्यासाठी तसे केले असावे. मात्र आता जे खोदकाम केले जात आहे याचे उद्देश प्राचीन शहारांबद्दल आपल्या ज्ञानात अधिक भर पाडणे आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....