Home मनोरंजन अबब! ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमासाठी आमिरला देण्यात आली तब्बल ‘इतक्या’ कोटींची फी, आकडा ऐकून नक्कीच डोळे होतील पांढरे 
मनोरंजन

अबब! ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमासाठी आमिरला देण्यात आली तब्बल ‘इतक्या’ कोटींची फी, आकडा ऐकून नक्कीच डोळे होतील पांढरे 

6
Aamir Khan
Aamir Khan

कोणताही नवीन सिनेमा येणार म्हटले तर मीडियामध्ये त्या सिनेमाबद्दल अनेक चर्चा सुरू होतात. कलाकार कोण असतील? दिग्दर्शक कोण असेल? सिनेमाची कथा काय असेल? सिनेमा प्रदर्शित कधी होणार? असे अनेक प्रश्न मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजतात. मात्र यासर्व प्रश्नांमध्ये एक प्रश्न नेहमीच भाव खाऊन जातो आणि तो म्हणजे त्या सिनेमासाठी कलाकरांना किती मानधन दिले जाणार. आता कलाकार जेवढा मोठा तेवढेच त्याचे मानधन मोठे असणार हे तर सर्वांनाच माहित आहे. नवीन सिनेमासोबत येणाऱ्या सर्व प्रश्नांमध्ये कलाकारांचे मानधन हा प्रश्न खूपच गाजत असतो. सध्या घडीला कलाकारांचे मानधन हा विषय देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे आणतो आणि अमाप प्रसिद्धी मिळवून देतो. शिवाय कलाकारांचे मानधन त्यांची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढवत असते. 

लवकरच आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मागील काही वर्षांपासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. वर्षातून एकच सिनेमा करणाऱ्या आमिर खानचा (Aamir Khan) सिनेमा म्हणजे प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे आणि हटके पाहायला मिळणार हे तर नक्कीच. अगदी मोजके मात्र अतिशय उत्कृष्ट सिनेमे करणारा आमिर मागील बऱ्याच काळापासून या सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन सतत लांबणीवर पडत होते, मात्र आता २०२२मध्ये सिनेमाला प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला असून अखेर ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

प्रदर्शनाआधीपासुनच चित्रपटाने खूपच चर्चा मिळवली आहे. नुकतेच या सिनेमातील पहिले गाणे ‘कहानी’ प्रदर्शित करण्यात आले आहे. करीना कपूर आणि आमिर खान (Aamir Khan) या जोडीचा दुसरा सिनेमा असलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमासाठी या दोघांनी बक्कळ रक्कम फी म्हणून घेतल्याच्या चर्चा मीडियामध्ये गाजत आहे. या लेखातून जाणून घेऊया आमिरसह सिनेमातील इतर कलाकारांच्या मानधनबद्दल.

आमिर खान (Aamir Khan) बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट. आपल्या सिनेमात प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट देखील परफेक्ट होण्यासाठी त्याचा नेहमीच अट्टहास असतो. कदाचित हेच कारण असेल की आमिर सिनेमे कमी असले तरी बॉक्स ऑफिसवर आणि लोकांच्या मनावर राज्य करतात. आमिर नेहमीच हटके आणि जरा पठडीबाहेरील विषयांना चित्रपट करण्यासाठी प्राधान्य देत असतो. आता त्याच्या या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये नक्की काय वेगळे असेल ते पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तत्पूर्वी सध्या आमिरने सिनेमासाठी किती मानधन घेतले? हा प्रश्न तुफान गाजत आहे. एका रिपोर्टनुसार आमिरला (Aamir Khan) या सिनेमासाठी तब्ब्ल ५० कोटी रुपये दिले गेल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात तो एका पंजाबी व्यक्तीची लाल सिंह चड्ढाची भूमिका साकारणार आहे..

=======

हे देखील वाचा – पंजाबच्या कॅटरिनाला मिळाली मोठी संधी, भाईजानच्या ‘या’ सिनेमातून शेहनाज गिल ठेवणार बॉलिवूडमध्ये पाऊल 

=======

याशिवाय त्याची सिनेमातील अभिनेत्री असलेल्या करीना कपूरला तिच्या मनप्रीत कौर चड्ढा या भूमिकेसाठी ८ कोटी दिल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत आहे. यासोबतच सिनेमात नागा चैतन्य देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला ६ कोटी मानधन दिल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्री मोना सिंगला २ कोटी तर अभिनेता मानव वीजला १ कोटी मानधन दिले गेल्याची माहिती आहे. आता यावरून अंदाज लावू शकतो की, सिनेमाचे बजेट नक्की किती असेल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...