Home लाईफ स्टाईल चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरच्याघरी तयार करा हे 4 नॅच्युरल ब्लश
लाईफ स्टाईल

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरच्याघरी तयार करा हे 4 नॅच्युरल ब्लश

10
Home made blush
Home made blush

Home made blush : सुंदरता ही प्रत्येकालाच भावते पण या सुंदर दिसण्याच्या नादात आपण आपल्या त्वचेवर किती हानिकारक केमिकल्स प्रोडक्ट्सचा वापर करतो हे आपलं आपल्याच काळत नाही. या केमिकल्स प्रोडक्ट्सचा सकारात्मक प्रभाव पडेल असे नाही. याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. अशातच मेकअप करताना देखील काही समस्या उद्भवू शकतात. केमिकलयुक्त प्रोडक्ट्सएवजी घरगुती उपाय केल्यास नो मेकअप लूक करुन देखील तुमची त्वचा गुलाबी दिसण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया चेहऱ्यावरील नॅच्युरल ब्लशसाठी बीटाचा कसा पद्धतीने वापर करायचा याबद्दल सविस्तर…

बीटरूट ब्लश 

बीट खाल्याने आपले आरोग्य सुदृढ राहते. याशिवाय रक्ताचा प्रभाव ही आपल्या शरीरात उत्तम राहतो. सौंदर्य खुलवण्यासाठी बीटाचा रस चेहऱ्याच्या त्वचेला लावल्याने नैसर्गिक सुंदरता अधिक वाढली जाते. पुर्वीच्या काळात ज्यावेळी मेकअप प्रोडक्ट्स उपलब्ध नव्हे तेव्हा गालांना ब्लशसाठी बीटाचा वापर केला जात होता.आजही बीटाचा वापर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केला जातो. घरच्या घरी बीट रुट ब्लश तयार करण्यासाठी बीट उकळून त्याचा पल्प तयार करून घ्या त्याचा पल्पमध्ये एक थेंब ग्लिसरीन मिसळून घ्या. अशाप्रकारे तुमचा होममेड बीटरुट ब्लश तयार होईल. हा ब्लश एका लहान कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. याचा वापर मेकअप करताना ब्लश म्हणून करू शकता.  

गुलाबाचा ब्लश

-गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्याघरी नॅच्युरल ब्लश तयार केला जाऊ शकतो. गुलाबापासून ब्लश तयार करण्यासाठी ताजी गुलाबाची फुलं घ्या. याच्या पाकळ्या काढून खलबत्त्यात कुटून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये गरजे नुसणार आरारोटची पावडर मिक्स करुन घ्या. हा ब्लश एका काचेच्या कंटेनर मध्ये भरुन ठेवा. अशाप्रकारे होममेड गुलाबाचा ब्लश तयार होईल. याशिवाय सुक्या गुलाबांच्या पाकळ्यांपासून देखील ब्लश तयार करता येतो. यासाठी सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या खलबत्यात एकत्र कुटून घ्या आणि त्यात अरारोटची पावडर मिसळून सामग्री पुन्हा एकदा एकजीव करून घ्या. सुक्या पाकळ्यांचा ब्लश काचेच्या कंटेनर मध्ये भरून ठेवा. मेकअप करताना ब्रशच्या मदतीने गालांना ब्लश म्हणून लावा. (Home made blush)

Home made blush
Home made blush

=======================================================================================================

हेही वाचा :

Summer : उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

Sunscreen : जाणून घ्या सनस्क्रीनची इत्यंभूत माहिती

=======================================================================================================

गाजरापासून ब्लश कसा बनवावा 

-जर तुम्हाला गलांना हलका पीच रंगाचा ब्लश लावायचा असल्यास ऑरेंज रंगातील गाजाराचा वापर करा. यासाठी गाजर किसून घ्या आणि सुकवा. गाजर सुकल्यानंतर खलबत्यात कुटून  घेत यामध्ये अरारोटची पावडर मिसळून सामग्री एकजीव करून घ्या. अशाप्रकारे तुमचा नॅच्युरल पीच ब्लश तयार होईल. (Home made blush)

जास्वंदापासून असा तयार करा ब्लश

-जास्वंदांच्या फुलांपासून होममेड ब्लश तयार करण्यासाठी जास्वंदाची फुले खबलत्यामध्ये कुडून घ्या. यामध्ये अरारोटची पावडर देखील मिक्स करा. ब्लशला सुंगध येण्यासाठी त्यामध्ये एसेंशियल ऑइलचा वापर करू शकता. ब्लशचे मिश्रण तयार झाल्यावर एका छोट्या काचेच्या कंटेनर मध्ये भरुन ठेवा. हा ब्लश फ्रिज मध्ये स्टोअर करुन ठेवा जेणेकरुन दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. 

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....