Home राशीभविष्य वृश्चिक राशीचा भाग्योदय तर, सिंह, मकरेला अनपेक्षित लाभ.. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा  
राशीभविष्य

वृश्चिक राशीचा भाग्योदय तर, सिंह, मकरेला अनपेक्षित लाभ.. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा  

5
Weekly Horoscope

या आठवड्यात नवरात्र सुरु होत आहे. अनेकजणांचे नऊ दिवसाचे उपास असतात. सर्वत्र अत्यंत पवित्र आणि उत्साहाचे वातावरण असते. पण या आठवड्यात तुमच्याकडेही उत्साहाचे वातावरण असेल का? बघूया राशीभविष्य काय सांगते (Weekly Horoscope – 26 September to 2 October)

मेष –  धनेश शुक्र आपल्या राशीच्या षष्ठ स्थानात आलेला आहे, तर राशी स्वामी मंगळ धनस्थानातून भ्रमण करत आहे. आपल्या षष्ठ स्थानातून रवी, बुध, शुक्र आणि तेथूनच चंद्राचे भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला होत आहे. देवीच्या कृपेने नवीन कार्यारंभ होतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. विरोधकांवर मोठ्या कौशल्याने मात कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. प्रवासात मात्र आपले खिसा, पाकीट सांभाळावे. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्यकारक घटना घडतील. मनस्वास्थ लाभेल. 

शुभ दिनांक –  26, 27

वृषभ – राशी स्वामी शुक्राने नुकताच आपल्या पंचमस्थानात प्रवेश केला आहे. चतुर्थी रवी आणि पंचमेश बुध यांच्याशी शुक्र आणि चंद्राची युती होत आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गृह सुशोभीकरणासाठी नवीन आकर्षक वस्तूंची खरेदी केली जाईल. मातृसौख्य लाभेल. संतती संबंधीत सुवार्ता कानी येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी मात्र तूर्तास थांबावे. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल.  

शुभ दिनांक – 30, 31

मिथुन – नवरात्राच्या पहिल्याच दिवशी आपल्या राशीच्या सुखस्थानातून रवी बुध शुक्र आणि चंद्र यांचे होणारे भ्रमण आपणास अनुकूल फलदायी राहील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आपल्या संभाषण चतुऱ्याच्या जोरावर मोठी मजल माराल. मात्र संततीची काळजी वाटेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. लघुउद्योग अथवा गृह उद्योगातून नवीन कार्यारंभ होतील. नवीन वाहन वस्तूचे योग येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. उत्तरार्धात आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

शुभ दिनांक – 1, 2.

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून रवी, बुध, शुक्र आणि चंद्राचे होणारे भ्रमण आपणास शुभ फळे देणारे राहील. धाडसी निर्णय घेतले जातील आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. सहलीत सहभागी व्हाल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंड सौख्य लाभेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. पूर्वी केलेल्या एखाद्या चांगल्या कामाची पोचपावती मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल‌. उत्तरार्धात मात्र मनस्वास्थ्य बिघडवणारी एखादी घटना घडू शकते. 

शुभ दिनांक –  30, 1

सिंह – राशी स्वामी रवीचे, धनेश बुध आणि दशमेश शुक्राबरोबर धनस्थानातून भ्रमण होत आहे, तेव्हा नोकरीत बढती, बदलीचे योग संभवतात. जुनी येणी वसूल होतील. आपली आवक अनपेक्षितपणे वाढल्यामुळे  आनंदाला पारावार राहणार नाही. स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी खर्च केला जाईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कोर्ट कचेरीच्या कामातून त्रास होऊ शकतो. उत्तरार्धात प्रवासातून लाभ होतील. संततीच्या प्रगतीस अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. 

शुभ दिनांक – 30, 1

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला रवी, बुध, शुक्र आणि चंद्राचे आपल्या राशीतून होणारे भ्रमण अतिशय शुभ फलदायी आहे. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या वक्तृत्व कौशल्याने अनेकांना आपलेसे कराल व त्यामुळे आपले काम साधून घेता येईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. आपल्या शब्दाला वजन राहील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. अनपेक्षित खर्च उद्भवतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. 

शुभ दिनांक – 26, 27

तूळ – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून रवि-बुध, चंद्र- शुक्राच्या होणाऱ्या भ्रमणामुळे कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल अथवा धार्मिक शुभ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. विरोधकांच्या कारवायांना बळी पडू नका. कोणालाही सल्ला देऊ नका अथवा जामीन राहू नका. कुटुंबात कठोर शब्दांचा वापर टाळल्यास वादंग टळतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. शेजाऱ्यांचेे सहकार्य लाभेल. 

शुभ दिनांक – 1, 2

वृश्चिक – सप्तमेश शुक्राने नुकताच आपल्या भाग्यस्थानी प्रवेश केला आहे. रवी बुध शुक्र आणि चंद्राचे लाभस्थानातून होणारे भ्रमण आपल्या भाग्योदयास पूरक राहील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. नोकरीत बढतीचे योग संभवतात. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. विविध व्यावसायिक उपक्रमातून लाभ होतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून आपली कामे पूर्ण कराल. 

शुभ दिनांक – 30,1

धनु – आपल्या राशीच्या दशमस्थानातून रवी, बुध, शुक्र आणि चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या कामाची वरिष्ठांकडून स्तुती केली जाईल.  मोठ्या आत्मविश्वासाने योग्य नियोजन करुन सर्व कामे पार पाडाल. स्त्री वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. कोणत्याही गोष्टीचा अति विचार टाळावा. कोर्ट कचेरीच्या कामातून मनस्ताप होण्याची शक्यता संभवते. आपल्या चांगुलपणातला तडा जाणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धा परीक्षातून विद्यार्थ्यांना यश लाभेल. 

शुभ दिनांक – 1, 2

मकर – भाग्यस्थानातून रवी, बुध, शुक्र आणि चंद्राचे होणारे भ्रमण आपला वैयक्तिक उत्कर्ष करणारे राहील. आपल्या जबाबदाऱ्या, मानसिक ताणतणाव कमी होण्याचा हा कालावधी आहे. अनपेक्षित लाभ होतील. प्रवास योग घडतील. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. नियोजित कामे पूर्ण होतील. मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. कामाचा व्याप वाढेल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. उत्तरार्धात आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. विवाहेच्छुक तरुणांनाआपल्या मनपसंत जोडीदार मिळेल. मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणाल. 

शुभ दिनांक – 30, 1

कुंभ – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून रवी बुध शुक्र आणि चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या प्रगतीची वार्ता कानी येईल. सासुरवाडी करून लाभ होतील, तसेच वडिलोपार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. कमी श्रमात जास्त पैसा मिळेल. उष्णतेचे विकार, कफ विकार तसेच संसर्गजन्य विकार यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. 

शुभ दिनांक –  30, 1

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून रवी, बुध, शुक्र आणि चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाह इच्छुक तरुणांचे विवाह जमतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. भागीदारी व्यवसायातून चांगले लाभ होतील. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश प्राप्त होईल. उत्तरार्धात वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. 

शुभ दिनांक – 1, 2

– श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Navpancham Yoga
राशीभविष्यलाईफ स्टाईल

Navpancham Yoga : नवपंचम राजयोगाच्या निमित्ताने ‘या’ राशींना मिळणार मोठा लाभ

अतिशय जुन्या काळापासून भारतामध्ये ज्योतिषशास्त्र (Astrology) प्रचलित आहे. आकाशात असणारे ग्रह, तारे...

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशींना राजकारणात मिळेल अनपेक्षितपणे संधी

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ राशीसाठी असेल खास

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....

Weekly Horoscope
राशीभविष्य

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते....