Home प्रेस रिलीझ चाकरमानी निघाले कोकणात
प्रेस रिलीझसामाजिक

चाकरमानी निघाले कोकणात

9

गणेशोत्सवासाठी अवघा एक महिन्या शिल्लक असताना आतापासूनच मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येनं सिंधुदुर्गकडे रवाना झाले आहेत. यामुळं खारेपाटण चेकपोस्टवर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळं यंदा मात्र चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार असल्याचं टिपण जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांनी आत्तापासूनच गाव गाठण्यासाठी तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसांत २ हजार चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्हात दाखल झाले आहेत. परिणामी, इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक दाखल झाल्यानं खारेपाटाणे चेक पोस्टवर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मार्च महिन्यात राज्यात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर मुंबई, ठाणे शहरातील नागरिकांनी गावाकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. चाकरमान्यांचा ओघ सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई व राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची चेकपोस्टवर नोंद केली जात आहे.

केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित केला आहे. तसंच, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी व गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात असं नियम चाकरमान्यांना पाळावे लागणार आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...

Varanasi
सामाजिक

Varanasi : देव दिवाळीचे महत्त्व !

दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान...

Mathura
सामाजिक

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी...